प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
बेस्ट वर्कर्स युनियन चे उपाध्यक्ष असलेले श्री रुपेश नारायण पाटील यांची कालभैरव मंडळ मुंबई च्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. मंडळाला १०० वर्षाचा इतिहास आल्याचा जाणकार सांगतात. कालभैरव मंडळाची पंचक्रोशीत एक वेगळी ओळख आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणीक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या या मंडळात तरुणांचा भरणा अधिक आहे, त्यातच रुपेश पाटील यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जुन्या कार्यर्त्यांचा अनुभव आणि नव्या कार्यकर्त्यांच्या साथीने ते नवनवीन उपक्रम राबवतील यासाठी त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Post a Comment