संजय खांबेटे म्हसळा
भारिप बहुजन महासंघ जनसंपर्क म्हसळा शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले. तालुक्यातील विविध गावातून बहुसंख्येने भारीपचे कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता, त्याचबरोबर श्रीवर्धन, माणगांव, तळा, रोहा, बोर्ली, महाड, खोपोली आशा विविध तालुक्यातुन बहुसंख्येने सभासद कार्यकर्ते उपस्थित होते, प्रामुख्याने उपस्थित असलेला तरुण वर्ग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला त्यामुळे सर्वत्र भारिप वातावरण होते
श्रीवर्धन मतदार संघामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या ५ तालुक्यांपैकी म्हसळा तालुक्याने सर्वात शेवटी भारिप बहुजन महासंघ या पक्षाची पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली व सर्वप्रथम रायगड जिल्ह्याच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष दीपक दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू समितीचे स्थापना करण्यात आली, सुकाणू समितीच्या माध्यमातून म्हसळा तालुक्यामध्ये धार्मिक व सामाजिक संघटनांना विश्वासात घेऊन पाहिली ऐतिहासिक सभा ७ नोव्हेंबर २०१८ रोजी यशस्वी पार पाडली व पुढील दोन ते अडीच महिन्याभरात तालुक्यातील गावा गावा पर्यंत व मुंबई मध्ये गाव मंडळानं पर्यंत भारीपचा प्रसार व प्रचार सुकाणू समिती व सम्यक विध्यार्थी आंदोलन यांच्या सहकार्याने करण्यात आला._
म्हसळा तालुक्यात पहिल्यांदाच आंबेडकरी चळवळीचं केंद्र व तमाम बहुजनांच्या स्वप्नातील आणि आपल्या सर्वांच्या हक्काचं पक्ष प्रकाशगड जनसंपर्क कार्यालयाची स्थापना म्हसळा या ठिकाणी करण्यात आली.
तालुका व शहरासाठी पुढील कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.
अध्यक्ष: अनिल तांबे (आबा),सरचिटणीस: सिद्धार्थ मोरे
उपाध्यक्ष: भागवत येलवेकोषाध्यक्ष: राजेश जाधव
कार्यालयीन सचिव: वैभव तांबे
म्हसळा शहर पदाधिकारी अध्यक्ष: विनोद साळवी
महासचिव: सुनील नाईकतालुका संपर्क प्रमुख: प्रदीप मोहिते
प्रमुख संघटक: महेश येलवे,संघटक: प्रांजु तांबे


Post a Comment