म्हसळ्याची गुणवत्ता उल्लेखनीय - आदिती तटकरे


म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्याचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता निश्चितपणे उल्लेखनीय असून तालुक्याचा शैक्षणिक पॅटर्न हा इतरांसाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत जि . प . अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले . या प्रसंगी जि . प . शिक्षणाधिकारी ( प्राथ , ) शैलजा दराडे , माध्य . शिक्षणाधिकारी थोरात , राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस अलिशेठ कौचाली , जि . प . सदस्य बबन मनवे , उपसभापती संदिप चाचले , माजी सभापती उज्वला सावंत , माजी उपसभापती मधुकर गायकर , स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर , माजी सभापती नाजिम हसवारे , गटविकास अधिकारी वाय . एम . प्रभे प्राचार्य दिनेश चौधरी , गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे , माणगाव गटशिक्षणाधिकारी मोहिते , लोट म्हात्रे , कक्ष अधिकारी हेमंत माळी , लक्ष्मण कांबळे , महामुलकर , सर्व केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक उपस्थित होते . आदिती तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले , शिक्षक हा सर्वश्रेष्ठ गुरु असून गुरुचे स्थान हे समाजात अनन्य साधारण असून सर्वांनीच त्यांचा मान राखणे अत्यावश्यक आहे कर्तव्यदक्ष शिक्षकांमुळे तालुक्याचा नावलौकिक वाढत असतो , याचे भानही ठेवणे गरजेचे आहे . माझ्या गुजंकडून मला मिळालेली ज्ञानाची पुंजी ही माझ्या जीवनाची गुरुकिल्ली ठरली . शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यावर येत्या २ दिवसात संबंधित अधिकार्यांची बैठक बोलवून शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले . गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्याकडे ३ तालुक्यांचा चार्ज असूनदेखील तालुक्याची कामगिरी उत्तम ठेवल्याबद्दल संतोष शेडगे यांचे त्यांनी कौतुक केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा