दिघी पोर्ट प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या उपोषणाला काँग्रेस चा जाहिर पाठिंबा


सर्फराज दर्जी : बोर्ली पंचतन

रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले दिघी गावात विकसीत होत असलेल्या दिघी पोर्टच्या हुकूमशाही कारभारा विरोधात शिवसेनेने अमरण उपोषणाचे हत्यार उचलेले आज 4 दिवस पुर्ण झाले असून  जाणीवपूर्वक स्थानिकांच्या मागण्यांकडे दिघी पोर्ट दुर्लक्षित करत आहे,मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेच्या संघटनेच्या वतीने वाहतुक सेना राज्य सचिव नरेशजी चाळके व श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर आणि महिला कार्यकर्त्या निशा पाटील यांनी  26 जानेवारी दुपारी 3 वाजता  दिघी पोर्टच्या गेट समोर उपोषणाला बसलेले 4 दिवस झाले असता श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेने पक्षाच्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला असून. ह्या पाठिंबाला रायगड जिल्हा विभाग अल्पसंख्या अध्यक्ष  काँग्रेसचे मौलाना दानिश लांबे तथा म्हसळा तालुका अध्यक्ष डाॅ.मुईझ शेख, सोबत सादिक राऊत, शब्बीर फकिर, आदम बगदादी व आपल्या तमाम  काँग्रेसच्या कार्यकर्तेंनी उपस्थिती दर्शवली. 

👉🏻 आज इथला भुमीपुत्र दिघी पोर्टला जागे जमीन देऊन दिवाळाखोर झाला, पण प्रशासनाला अध्यापी त्याचा गांभीर्य नाही, दिघी पोर्टच्या मधे येथील स्थानिकांना नौकरी नाही,हा उपोषण सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, म्हणून आम्ही  काँग्रेस  पक्षाच्या  वतीने ह्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत.
- डाॅ.मुईझ शेख, अध्यक्ष काँग्रेस म्हसळा तालुका

आज आमच्या उपोषणाला 4 दिवस झाले, पण अजुन पर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी आमचा हालचाल पाहण्याची आलेला नाही, जर का त्यांना वाटत असेल की आम्ही असेच उपाशी पोटी मरू, तर आमची पण हिच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला उपाशी पोटी मरताना पहावे.
-नरेश चालके, सचिव महाराष्ट्र राज्य अवजड वाहतुक सेना

दिघी पोर्ट हा अस्तांतरीत होतोय , इतर तरी कोणती कंपनी चालवाय घेतोय ,चालवाय घेतली तरी  पण आमच्या इथल्या स्थानिक लोकांनचे प्रश्न कधी मार्गी लागणार ?हा मोठा प्रश्न आहे. आमचा आज हा चौथा दिवस आहे, तरी  दिघी पोर्ट प्रशासनाने आमच्या कडे डोकावून पण बघीतलेला  नाही, मि ह्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.
-सुकुमार तोंडलेकर, अवजड वाहतुक अध्यक्ष, श्रीवर्धन तालुका

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा