दिघी: गणेश प्रभाळे
एकीकडे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सागरमाला प्रकल्पातून सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत . कोकणातील मासेमारी , नारळ सुपारीच्या बागा , निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे यांना जोडणारे रस्ते असा सर्वात मोठा प्रकल्प जाहीर करुन पर्यटनाला चालना मिळणार आहे . तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील दिघी येथील रोजगार मिळवून देणारी पारंपरिक मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे . श्रीवर्धन तालुक्यालगत राजपुरी खाडीवर उभे राहत असलेले दिघी बंदर हे पारंपरिक मासेमारीला घातक ठरणार या भितीने दिघी , आगरदांडा व राजपुरी परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त झाले आहेत श्रीवर्धन तालुक्यातील दिघी या पारंपरिक बंदर खाजगी करणातून विकास या संकल्पनेतून अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रकल्प दिघी पोर्ट विकसित करत आहे . दिघी बंदर अद्याप पन्नास टक्के देखील विकसित झाला नाही . अतिशय कमी भावात जमीनी देताना , दिघी पोर्ट साठी आपण जमीनी देतोय असा विचारही जमीनदारांच्या मनात आला नव्हता . सध्या सुरु असलेला महाकाय जहाजांचा प्रवास यामुळे कालांतराने सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्यांवर बंदी घातली जाणार आहे . ही भीती भूमिपुत्रांमध्ये मनात घर करून उभी राहिली आहे या प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वी त्यांच्या कडून विविध आश्वासन देण्यात आली होती . त्यात गावातील सुविधा स्थानिकांना रोजगाराचे आश्वासन दिले गेले होते . या गोष्टींची पूर्तता अद्याप झालेली नाही . या विरोधात आज ही नाराजी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात . दरम्यान वातावरणातील बदल , सद्या होत असलेल्या अवेळी वादळाची हजेरी, मासेमारी दुष्काळ होत असताना त्यामध्ये कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे . दिघी बंदरात गेली पाच सहा वर्षापासून मोठी जहाजे येत आहेत . ही जहाजे येत असताना दिघी गावातील मच्छीमार बांधवांनी मच्छिसाठी टाकलेली जाळी व डोलवी तुटली जातात . त्यामुळे जाळ्याचे व म च्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . पुर्वी दिघी पोर्ट प्रत्येक जहाजामागे नुकसान भरपाई देत होते . मात्र सध्या नुकसान भरपाई मिळत नाही . बंदरामुळे दिघी गावातील मच्छिमारी करणारी साठ कुटुंबे बाधित झाली आहेत .
दिघी बंदरात महाकाय जहाजांची होणारी वाहतूकीमुळे आम्हा मच्छिमारांना मोठया संकटाचा सामना करावा लागत आहे . मात्र , याकडे कुणी ही मदतीला येत नाही . वेळोवेळी होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विचारलं सुद्धा जात नाही.
-बाळाराम खेलोजी , अध्यक्ष दिघी कोळी समाज

Post a Comment