जिजामाता हायस्कुल आगरवाडा येथे जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन साजरा.


संजय खांबेटे :  म्हसळा 
जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन आज म्हसळा तालुक्यातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या आगरवाडा हायस्कुल च्या भव्य पटांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करून संपन्न झाला.  कार्यक्रमाला जिजामाता,तालुका वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, प्रेसक्लब अध्यक्ष अशोक काते,पंचक्रोशी नाभीक समाज अध्यक्ष दिलीप शिर्के,नाभीक समाज तालुका अध्यक्ष प्रदीप कदम,माजी केंद्रप्रमुख उदय कळस,श्रीकांत बिरवाडकर,अंकुश गाणेकर,मुख्याध्यापक कांबळेसर,सुतार सर आणि विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.
     महादेव पाटील यानी आपल्या आभ्यासू भाषणात हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर तब्बल साडेचार महीन्याने हिंदुस्थानात विलीन होणाऱ्या संस्थानातील आपल्या भागातील आजची मानसिकता अजुनही तशाच पद्धतीची आहे याचे दाखले देऊन  खंत व्यक्त केली.भारत / पाकीस्तान क्रिकेट स्पधेत भारताचा पराभव झाल्यावर काही पाकीस्तान प्रेमी नागरीकानी जंजीरा संस्थानाची आठवण केली, जंजीरा संस्थान विलीन झाले नसते तर अशी वेळच आली नसती असे शासन दरबारात मत आले, सन २०१६ च्या पहिल्या जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिनाचे म्हसळे येथील प्रसंगाची आठवण सुध्दा पाटील यानी करून दिली. शासन आता सर्तक झाले आहे. शासनाने जंजीरा कील्ल्यावर सतत तिरंगा फडकावीत ठेवला आहे, शासन मराठवाडा मुक्ती दिन ज्या प्रमाणे शासकीय पातळीवर  साजरा करतो त्याच पध्दतीने जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन दर ३१. जानेवारीला शासनाने साजरा करावा अशी आग्रही मागणी पाटील यानी केली.
       यावेळी संजय खांबेटे , अशोक काते , कांबळे सर,शाळेतील विद्यार्थी रीतू नाक्ती, हर्षदा नाक्ती, कल्पेश खारगावकर, तेजस्वी पारदुले यानी जंजिरा संस्थांनचा इतिहास कथन करताना जंजिरा मुक्ती संग्रामातील प्रजा परिषदेचे कार्य  स्थानिक कार्यकर्ते   विष्णुपंत पेंडसे, केशवराव खांबेटे, बापूसाहेब दातार यानी नानासाहेब पुरोहीतांचे नेतृत्वा खाली  संस्थानाचे व नबाबाचे विरुद्ध म्हसळयात केलेल्या उठावाचे सर्वानाच स्मरण करून दिले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा