म्हसळा : प्रतिनिधी
माजी मंत्री राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजना अंतर्गत सुरई येथील ५१ लाखांचे नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन करून आपणच सरकारमध्ये आहोत , असे भासवून जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचे काम करित असल्याचा आरोप काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष तथा सुरई गाव मुस्लीम समाजाचे अध्यक्ष अकमल कादिरी यांनी केला आहे . म्हसळा नगरपंचायतीच्या पाणीयोजनेचे भूमीपूजन ३ वेळा केले . परंतु , आजही शहरात पाणीटंचाई जाणवत आहे जनतेला विविध आमिषे दाखवून त्यांची फसवणूक करित आहेत . मात्र म्हसळ्यातील जनता तटकरांच्या या भूलथापांना न भूलता आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल असा दावा त्यांनी केला .

Post a Comment