श्रीवर्धन : वार्ताहर
दिघी पोर्ट व अंतर्गत असलेल्या कंपन्या , पोस्को कंपनी यांच्या विरोधात शिवसेना अवजड वाहतूक सेनेने येत्या प्रजासत्ताक दिनी पोर्टच्या बाहेर आमरण उपोषणास बसण्याच इशारा दिला आहे महाराष्ट्र आवजड वाहतुक सेना अध्यक्ष बल इंद्रजीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वतीने लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेल्या मागण्यांना न्याय मिळविण्यासाठी जानेवारी पासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा सकारात्मक विचार करून न्याय न मिळाल्यास जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शिवसेना अवजड वाहतुक सेना सचिव नरेश चाळके व श्रीवर्धन म्हसळा अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर आमरण उपोषणास बसणार आहेत . त्याबाबतचे निवेदन श्रीवर्धन तहसिलदार जयराज सुर्यवंशी यांना देण्यात आले . या निवेदनात या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधले आहे माजी आमदार तुकाराम सुर्वे , शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर , अवजडवाहतुक सेना श्रीवर्धन - म्हसळा अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर , शहर प्रमुख संतोष वैश्वीकर , सुरेश ( दादा ) मांडवकर आदीसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment