निवडणुकीत बदल अपेक्षित : आदिती तटकरे


बोर्लीपंचतन : अभय पाटील
लोकसभेची निवडणूक हे मोठे आव्हान आहे जनतेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बदल अपेक्षित आहे . सर्व कार्यकर्यांनी आता कामाला लागून अंतर्गत मतभेद विसरावेत . तसेच स्थानिक नेते मंडळी व ग्रामस्थांनी समन्वय साधून निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले . श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन गावासाठी १० लाख खर्चून पुर्णत्वास गेलेल्या घरोघरी नळपाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथे रायगड जिल्हा परीषद सेस फंडातून मंजूर १० लाख रूपये निधीतून पुर्णत्वास गेलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महमद मेमन , तालुकाध्यक्ष दर्शन विचारे , उपाध्यक्ष सुचीन किर , पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक , बोर्लीपंचतन उपसरपंच मंदार तोडणकर , जिल्हा संघटक नंदू पाटील , महिला तालुकाध्यक्ष ज्योती परकर , सुरेश तांबडे , बाबू परकर , ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष बबन खेडेकर , सचिव अनंत खेडेकर , शरद महाडीक , शांताराम वरणकर , संतोष खेडेकर , दिपक खेडेकर , प्रकाश खेडेकर , सुरेश परबळकर , प्रफुल्ल दिवेकर , प्रसाद म रकर , संतोष गायकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते . आदिती तटकरे म्हणाल्या की , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच विकास कामांच्या म उद्दयावर निवडणुकीस सामोरे जात आला आहे . इतर पक्ष धार्मिक व भावनिक मुद्यांचा वापर करीत निवडणुकीमध्ये जनतेची दिशाभूल करत आले आहेत . रायगड लोकसभा मतदार संघ हा मोठा मतदार संघ असल्याने येवू घातलेली लोकसभा निवडणूक ही आपणासाठी मोठे आव्हान आहे प्रत्येकाने अंतर्गत मतभेद विसरून लोकसभा निवडणुकीस सामोरे जाण्यास सज्ज होवुया . मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आपला काही मतांनी विजय झाला नसला तरी आता मात्र जनतेलाच या भागामध्ये बदल हवा असल्याने या लोकसभा निवडणुकीमध्ये बदल निश्चित होईल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला . कार्यकत्यनी आतापासून निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असेही आवाहन त्यांनी केले . कार्यक्रमाच्या वेळी नळपाणी योजनेच्या टाकीसाठी जमीन देणाच्या शांताराम वरणकर यांचा सत्कार करण्यात आला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा