स्वच्छता अभियानांतर्गत म्हसळ्याचा कायापालट



म्हसळा : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत शहरातील सर्वच भाग आज स्वच्छ झाल्या आहेत . त्याचप्रमाणे शहरातील भिंती आज स्वच्छतेच्या संदेशाने सजल्या आहेत . शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात येत असून स्वच्छतेबाबत नगरपंचायतीचा आदर्श निर्माण करणार असल्याचे नगराध्यक्षा फलकनाझ हहुर्जुक यांनी शहरात ज्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो , त्या ठिकाणी फलक लावले आहेत व तेथील नागरिकांना सुचनाही देण्यात आल्या आहेत . तसेच शहरामध्ये घनकचरा संकलनांसाठी नगरपंचायतीकडून खासगी ठेकेदारामार्फत कामे सुरु आहेत . त्यासाठी दैनंदिन मजूर व ट्रैक्टरमार्फत शहरात स्वच्छता करण्यात येत आहे या मोहिमेध्ये नगरपंचायत मुख्याअधिकारी वैभव गारवे , नगराध्यक्षा फलकनाझ हर्जक , स्वच्छता सभापती तथा उपनगराध्यक्ष संजय कर्णिक व सर्व नगरसेवक , कर्मचारी यांनी शहरातील प्लास्टिक पिशवी वापरावर अंकुश ठेवला आहे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहरात बाजारपेठेमध्ये स्वच्छतेची कामे रात्रीदेखील केली जातील , असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी एका संवाद बैठकीत सांगितले यावेळी आपल्या नगरपंचायतीचा विकासाचा आदर्श निमार्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांसमवेत नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले . अडीच वर्षात म्हसळा शहराचा विकास करण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व नागरिकांनी चांगली मदत केल्याने शहर नटले आज म्हसळा आहे यापुढे म्हसळा शहराची स्वच्छता ही अगदी चकाचक असणार आहे . नागरिकांना आनंदी व निरोगी जिवन जगण्यासाठी नगरपंचायत कटीबद्ध असणार असल्याचे मत नगराध्यक्षा फलकनाझ हुनॅक यांनी सांगितले आहे . 

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत शहरातील सर्वच भाग आज स्वच्छ झाला आहे शहरातील भिंती स्वच्छेतेच्या संदेशाने सजल्या आहेत . स्वच्छतेच्या जनजागृती व माहितीसाठी शहरातील शासकीय व निमशासकीय भिंतीदेखील स्वच्छतेच्या संदेशाने नटणार आहेत . नागरिकांना आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी नगरपंचायत कटीबद्ध आहोत . 
- फलकनाझ हुर्जुक,  नगराध्यक्ष न . पं . म्हसळा


शासनाच्या निकषाप्रमाणे शहाराचे कामकाज सुरू आहे शहरातील भिंती आज स्वच्छतेच्या संदेशाने सजल्या आहेत . शहरात बाजार पेठे मध्ये स्वच्छतेची कामे रात्री देखील  केली जातील. स्वच्छ सुंदर म्हसळा नगरी करण्यास आम्ही नागरिकांच्या सहकार्याने सुरू केले आहे . त्यामुळे यश येत आहे. 
-वैभव गारवे, मुख्याधिकारी न . पं . म्हसळा 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा