श्रीवर्धन : भारत चोगले
आजच्या युगामध्ये गुन्हयांचे प्रमाण जरी दिवसेंदिवस वाढत आहे . मात्र अनेक ठिकाणी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अत्यल्प आहे . परंतु याला अपवाद ठरले आहे ते श्रीवर्धन पोलीस स्थानक . सन २०१८ मध्ये श्रीवर्धन पोलीस स्थानक अतंर्गत विविध प्रकारचे ३९ गुन्हे घडले आहेत . या सर्व गुन्हयांचा तपास लावण्यात श्रीवर्धन पोलीसस्थानक यशस्वी ठरले आहे श्रीवर्धन विभागीय पोलीस उपधिक्षक बापूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी श्रीवर्धन पोलीस स्थानकाचा चार्ज घेतल्या पासुन श्रीवर्धन तालुक्यामध्ये गुन्हयचे प्रमाण फारच कमी झाले होते . त्यामुळे त्यांचे श्रीवर्धन तालुक्यातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे पोलीसांच्या या धडक मोहिमेमुळे तालुक्यात गुन्हयांचे प्रमाणही कमी होत झाल्याचे दिसुन येत आहे . त्याचप्रमाणे जुन २०१७ पासुन पोलीस निरिक्षक सुरेश खेडेकर यांनी पोलीस कर्मचार्यांच्या मदतीने श्रीवर्धन पोलीस स्थानक अतंर्गत चोख कामगिरी बजावली असल्याचे चित्र दिसत आहे तसेच नव्याने श्रीवर्धनच्या पोलीस निरीक्षक पदावर काम करीत आलेले शिरोळे हेही तितक्याच जोमाने श्रीवर्धनचा कारभार सांभाळत आहे . श्रीवर्धन पोलीसस्थानक हद्दीत समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये , सर्व येणारे सण हे सर्व समाजातील लोकांनी गुणगोविंदाने कसे साजरे करता यावेत . यासाठीच प्रयत्न असतो . श्रीवर्धनचा एकुण क्षेत्रफळ ६२८ . ३४ चौ . कि . मी असुन संपुर्ण गावाची लोकसंख्या ४६ , ९३९ आहे . श्रीवर्धन पोलीस ठाणे अतंर्गत एकुण ४८ गावे असून श्रीवर्धन बिट व दुसरा बागमांडला बिट असे ठरविण्यात आले आहे श्रीवर्धन बिटामध्ये श्रीवर्धन , आराठी , मेटकणी , बाळवटी , खारगांव , आरावी , कोंडविल , शेखाडी , भटटीचामाल , खेड़ी , भोस्ते , जसवली , शिरवणे , चिखलप , हुनरवेली , पुनीर गुळ , बापवली , मामवली , मेघरे , भरडोली , पांगतोली , वडघर , रानवली असे एकुण २४ गावे असुन बिट बागमांडलामध्ये बापवण , काढणे , गालसुरे , निवळे , जावेळ , धारवली , साखरोणे , बडशेत वावे , वावेतर्फ श्रीवर्धन , कोंढे श्रीवर्धन , गाणी , निगडी , गौळवाडी , सायगांव , काळींजे , कुरवडे , मारळ , हरेश्वर , बागमांडला दांडा , बागमांडला , कोलमांडला , कारिवणे , आडी अशा २४ लहान मोठ्या गावांचे विभाजन केलेले आहे . श्रीवर्धन पोलीसस्थानकासाठी १ पोलीस निरीक्षक , २ पोलीस सहाय्यक निरिक्षक , ४ सहाय्यक फौजदार , ८ पोलीस हवालदार , ६ पोलीस नाक १३ पोलीस शिपाई आहेत . श्रीवर्धन पोलीस स्थानक अतंर्गत ११ ऑगस्ट २०१८ रोजी कृष्णा हिलम वय १० वर्ष गालसुर आदिवासीवाडी याचा आकस्मित मृत्यू म्हणुन दाखल झाला होता . परंतु त्या लहान बाळाला विहिरीमध्ये ढकलुन खून करण्यात आला याचा तपास श्रीवर्धन पोलीसस्थानक यांनी २० ऑगस्ट २०१८ रोजी लावुन आरोपी पकडण्यात आले हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच श्रीवर्धन पोलीसठाणे हद्दीमध्ये चोऱ्या झाल्या होत्या . यात एक म्हणजे श्रीवर्धन एसटीस्टैंड परिसरामध्ये प्रवाशाचे पॉकेट चोरण्यात आले . तर दुसर्या घटनेत आरटिओने रिक्षा पकडुन श्रीवर्धन एसटी स्टैंड बसस्थांनक आगारामध्ये ठेवण्यात आले होते तो रिक्षा चोरून नेण्यात आला आणि तिसरी म्हणजे निगडीकाठी या ठिकाणी घराचे काम चालू असताना घरामध्ये कोणी नसताना रंगाचे डब्बे , आणि काही वस्तू चोरट्याने चोरले होते . या तिन्ही चोरी करणाऱ्या चोरांना श्रीवर्धन पोलीसांने पकडुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली . या पोलीस कार्यक्षेत्रामध्ये लहानमोठे एकुण १५ भानगडी झाल्या दोन चिटिंग , तीन सरकारी हल्ले त्यामधील महत्वाचे म्हणजे श्रीवर्धन समुद्रकिनारी पुणे येथील प्र वेडिंग शुटसाठी ११ पर्यटक आले होते , त्यांना हे शुटकरण्यासाठी आपण परवानगी घेतली आहे का असे श्रीवर्धनचे पोलीस निरिक्षक सुरेश खेडेकर यांनी जाब विचारले असता त्या ११ पर्यटकांपैकी ८ पर्यटकांनी पोलीस निरीक्षक यांच्यावर हल्ला केला . त्या हल्ल्यामध्ये श्रीवर्धन पोलीस निरिक्षक सुरेश खेडेकर हे जबर जखमी झाले होते श्रीवर्धनच्या पोलीस निरीक्षकांवर पर्यटकांनी हल्ला केला होता . त्या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक नितीन जाधव यांनी घेऊन तपासाचे चक्र अतिवेगाने सुरू करून त्या त्यापैकी ८ आरोपींना श्रीवर्धन पोलिसठाणे यांनी पकडुन पोलीस कोठडी देण्यात आली . त्यानंतर त्या आरोपीची जामिनावर सुटका झाली असली , तरी आज हे प्रकरण न्यायालयीन आहे .
श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकूण ३९ गुन्हे दाखल ३९ गुन्हे उघड....
श्रीवधन पोलीस स्थानक अंतर्गत १ खून ; ३ चोऱ्या ; भानगड १५ ; चिटींग २ ; सरकारी हल्ले ३ ; इतर १५ गुन्हे तसेच श्रीवर्धन पोलीस ठाण्याअंतर्गत श्रीवर्धन बीट व बागमांडला ; श्रीवर्धन बीटामध्ये २४ गाव तर बागमांडला बीटामध्ये २४ गाव एकूण ४८ गावे येतात

Post a Comment