संजय खांबेटे : म्हसळा
बुधवार दिनांक २३ जानेवारी २०१९ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त म्हसळा तालुक्यातील शिवसेना संघटना व अन्य स्थानिक पातळीवर तालुक्यात व शहरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमात शैक्षणिक साहीत्य , फळे, ब्लँकेट व अन्य साहीत्याचे वाटप कार्यक्रमाचे तालुक्यातील मेंदडी व आंबेत खाडी पट्टा, तळवडे, चिरगाव, आगरवाडा, केलटे ,नेवरुळ, तळवडे परीसरांतील सुमारे ७०ते ८० गावांतून जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सर्व कार्यक्रमांत त्या त्या भागातीत जेष्ठ शिवसैनिकांनी.युवसैनिकांनी,आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी व हितचिंतकानी उपस्थिती रहावे अशी विनंती स्थानीक अयोजकानी केली आहे . म्हसळा शहरातील कार्यक्रमात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मानवंदना.रुग्णांना फळवाटप, शाळा व अंगण वाडीतील विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप अशा कार्यक्रमाचे तसेच महादेव पाटील मित्रमंडळ (रजी. ) यानी जिजामाता हायस्कूल मध्ये शालेय साहीत्य वाटप अशा कार्यकामाचे शहर प्रमुख अनिकेत पानसरे व संस्थेचे अध्यक्ष अॅड . मुकेश पाटील यानी कळविले आहे.

Post a Comment