म्हसळा न्यू इंग्लिश स्कुल जवळ बायपास रस्त्यावर धुळीचे साम्राज्य ; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

फोटो संग्रहित

म्हसळा : बाबू शिर्के
म्हसळा शहराला पर्यायी मार्ग असणारा बायपास  रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे या रस्त्याचे नव्याने काम करण्यात येत आहे. मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच जेथे बायपास संपतो त्या ठिकाणी शाळा आहे. त्यामुळे येथे शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
कोणतेही काम करायचे झाल्यास गैरसोय होतेच. परंतु, त्यावर काही उपायोजना करून गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. मात्र या रस्त्याच्या करण्यात येणाऱ्या कामात प्रयत्नांचा अभाव दिसून येत आहे. जे एम म्हात्रे यांच्या कंपनीने हे काम घेतले या बायपासच्या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी मुरूम, माती टाकण्यात आले आहे. या मुरमावरूनच दिघीपोर्टची अवजड वाहतूक सुरु आहे. जेव्हा हि  वाहने धावतात, तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच रस्त्याचा बाजूला शाळा असल्याने या धुळीचा त्रास विदयार्थ्यांना होत आहे. या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आले असले तरी या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.शाळा प्रशासनाने वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही प्रशासन लक्ष घालत नसल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिली. 


या धुळीमुळे शाळेच्या विद्यार्थांना त्रास होत असून येत्या पंधरा दिवसात यावर कुठलीही उपाययोजना केली नाही तर या मार्गावरील वाहतूक बंद करू
- महादेव पाटील (माजी सभापती)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा