स्वराज्य चषक २०१९ मोठ्या उत्साहात मुंबईत संपन्न....



क्रीडा प्रतिनिधी : म्हसळा Live
स्वराज्य प्रतिष्ठान रायगड सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ६ वर्ष कार्यरत स्वराज्य चषक आयोजित दि. ६  जानेवारी २०१९ रोजी, ओव्हल मैदान मुंबई येथे भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या..
या भव्यदिव्य कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र मूर्तीस पुष्पहार अर्पण करून उदघाटन समारंभ श्री.अरविंद ठमके साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले..
सदर नियोजनबद्ध नेत्रदीपक आकर्षक आशा स्पर्धा स्वरूपी कार्यक्रमाला अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्याच दरम्यान प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून अनेक सामाजिक, संघटनेच्या कार्यावर, तरुणांच्या संघर्षासंबंधित, नव्या परिवर्तनाला एक वेगळं स्वरूप देणारी संघटना तसेच मैदानामध्ये जमीन वाचवा व व्यसनमुक्ती असे बॅनर लावून समाजाला एक क्रांतीचा संदेश आहात अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मते मांडली.त्यामध्ये उपस्थित कुणबी राजकिय संघटन समिती अध्यक्ष कृष्णा कोबनाक , तळा पंचायत समिती अध्यक्षा सौ. अक्षराताई कदम, कुणबी युवा मुंबई अध्यक्ष माधव कांबळे, कुणबी युवा मुंबई महाड विभाग प्रचारक मिलिंद चिबडे, रायगड जिल्हा कुणबी अध्यक्ष सचिन कदम, कुणबी युवा तळा अध्यक्ष डॉ. राजेश शिगवण सर, कुणबी युवा म्हसळा सरचिटणीस महेश शिर्के, कुणबी युवा संगमेश्वर अध्यक्ष संजय लोकम , कुणबी युवा बिग्रेड खारपट्टी विभाग संपर्क प्रमुख गजानन कदम, मनसे सायन शाखा अध्यक्ष अरविंदजी ठमके, भाजप दक्षिण मुंबई मंत्री महेंर टिंगरे,कुणबी युवा तळा सक्रिय कार्यकर्ते अविनाश पारावे, केशव पीठे,नितीन शिगवण, बलराम मोहिते, विजय घाडगे, नैणेश वाघे, कैलास शिंदे, स्वप्नील माने, रमेश करंजे, हरिश्चंद्र भोरावकर, मनसे युनियन युवा अध्यक्ष प्रवीण पाष्टे ,सुभाष बालगुडे-मनसे कुलाबा उपाध्यक्ष, गणेश वाघे- शिवसेना मंडणगड गण विभाग त्याचप्रमाणे संघटनेतील बांधवांचे गावप्रतिनिधी माया मुकटे- रहाटाड , सहादेव वाघवले- शेणाटे, विठ्ठल दुर्गावले, किशन धाडवे- ताम्हाणे, भगवान तांबे, रामेश्वर नवसे, तुकाराम गिजे,रोहिदास नवसे, लक्ष्मण जाधव-वाशी हवेली, विजय पाखड, नथुराम दुरे,संतोष दुरे, गणपत दुरे, सुरेश शिगवण-गणेशनगर,दिनेश जाधव- वरळ, नितीन नाक्ती तोंडसुरेराजेश सातम मजगाव आदी मान्यवर तसेच ग्रामीण ठिकाणहुन संघटनेचे तळा तालुका प्रमुख देवानंद शिगवण, म्हसळा तालुका प्रमुख निकेश भेकरे व ग्रामीण सभासद अतिष खंडागळे, स्वप्नील बैकर, ज्ञानेश्वर महाडीक, विशाल घाडगे , करण पाडवे त्याचप्रमाणें मुंबई विभागातील शेकडोंच्या संख्येने उपस्थित क्रिकेट प्रेमींची उपस्थिती लाभली...

🏆🏆 या स्पर्धेतील विजेते संघ 🏆🏆

🥇 प्रथम क्रमांक पारितोषिक २०,००० रु /- आणि चषक-कोलवट संघ (म्हसळा ) ,

 🥈 द्वितीय क्रमांक पारितोषिक १०,००० रु /-आणि चषक-गोवेलेकोंड संघ ( माणगाव ) ,

🥉 तृतीय क्रमांक पारितोषिक ४,००० रु /-आणि चषक-कुंभळेगाव संघ (तळा) ,

🏅 चतुर्थ क्रमांक पारितोषिक ४,००० रु /-आणि चषक-नांदलेगाव संघ (मुरूड) ,

उत्कृष्ट फलंदाज- विशाल (गोवलेकोंल ), उत्कृष्ट गोलंदाज- कु.अभिनव भुवड (कोलवट) मालिकावीर- नितेश गंभीर (कुंभळेगाव) उत्कृष्ट सामनावीर- (कु.ऋषिकेश शिंदे)

स्पर्धांचे आभार प्रदर्शन करताना संघटनेचे सल्लागार  सचिन आंबवले यांनी सामन्यात सहभागी झालेल्या तसेच विजेता संघाचे अभिनंदन करून सर्व संघटनेच्या सभासद ,क्रिकेट प्रेमी रसिक यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर या स्वराज्य चषकातून उपलब्ध होणार निधी संपूर्णपणे बहूजन समाजाच्या उन्नतीसाठी वापरला जातो असे  जाहीर केले.. 

तसेच हा भव्य चषक स्पर्धास्वरूपी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपला माणुस संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष मा. श्री.भास्करभाई कारे व सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने / ग्रामीण तसेच महिला विभाग तसेच सर्व ओव्हल मैदानावरील स्पर्धांमध्ये सहभागी असलेले संघ यांच्या विशेष सहकार्याने हा स्पर्धास्वरूपी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला...

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा