होलसेल बाजारांत भाज्यांच्या भावामध्ये प्रचंड वाढ होऊनही म्हसळयातील भाव नियंत्रणांत ; ग्राहकांच्या तुलनेत विक्रेते जास्त.


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा बाजारपेठ म्हणजे श्रीवर्धन- बोर्ली पंचतन -तळा या सर्वानाच मध्यवर्ती वाटते. नवीन वर्षात  होलसेल बाजारांत भाज्यांच्या भावामध्ये प्रचंड वाढ होऊनही म्हसळयातील भाव नियंत्रणांत आहेत असे चित्र आहे . म्हसळा शहरांत मार्केट यार्ड पुणे, वाशी, वाई व पनवेल बाजारातून होलसेल भाजी व फळ येत असतात, केळी जळगाव मधून येतात. भाजी -फळे यांचा भाव होलसेल बाजारांत ज्या प्रमाणात वाढतात त्या प्रमाणात म्हसळा बाजारात किरकोळ भाव वाढत नसल्याचा दावा स्थानिक व्यापाऱ्यांचा आहे. स्थानिक ग्राहकांच्या तुलनेत होलसेल व किरकोळ कापाऱ्यांच्या संखेत लक्षणिय वाढ झाली आहे. 

Related image

म्हसळा बाजारपेठेतील  डिसेंबर -जानेवारी मधील भाजीचे तुलनात्मक  दर- 
टॉमेटो - डिसेंबर १८ ला १५ रु किलो, जानेवारी ६ ला रु  ३०-४० किलो,
वांगी - डिसेंबर १८ ला ३५रु किलो, जानेवारी ६ ला ४० रु किलो,
भेंडी - डिसेंबर १८ ला ४० रु  किलो, जानेवारी ६ ला ६०रु कि. 
फ्लॉवर - डिसेंबर १८ ला ३५ किलो, जानेवारी ६ ला ५०रु किलो,
हिरवी मिर्ची - डिसेंबर १८ ला ४५ रु किलो, जानेवारी ६ ला रु ४० -५० किलो,
फरस्बी _ डिसेंबर १८ ला ७५ रु किलो, ६ जानेवारीला ६०-८० रु किलो,
गवार - डिसेंबर १८ ला ६० रु किलो, जानेवारी ६ ला  रु ७० किलो,
शेवगा शेंगा - डिसेंबर १८ ला २५ रु किलो, जानेवारी ६ ला रु ६०-८० रु किलो असे दर आहेत.

आम्ही महीन्यांतील काही दिवस म्हसळा येथे जावया कडे रहातो, तर काही दिवस मुलाकडे पुणे(सांगवी) येथे रहातो , दोनही गावांत भाजीचे दर सारखेच आढळतात.
-लक्ष्मीबाई राजमाने , गृहीणी.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा