श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते अनंत गुरव यांनी शहरातील काही विकास कामांतील त्रुटींबाबत आणि आवश्यक असलेल्या कामाबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना स्वतंत्र निवेदन देवून न . प . प्रशासनाचे लक्ष वेधले यात शहरातील जोशी हॉस्पिटल नाक्याजवळ एक हॉटेल , दोन हॉस्पिटल्स , किराणा मालाचे दुकान , शाळा , लँब असून तेथे रिक्षा स्टैंडही आहे त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे आणि वाहतूक कोंडी होते . याला पर्याय म्हणून जोशी हॉस्पिटल शेजारील गटारावर न . प . ने लोखंडी जाळी बसविल्यास तेथील रिक्षा त्यावर उभ्या राहतील व वाहतूक कोंडी होणार नाही असे गुरव यांनी सुचविले आहे . तर दुसर्या निवेदनात कोठारी यांच्या दुकानासमोरील पिचींग , नारायण पाखाडी येथील पळधे ( पोहा मिल ) यांच्या घराशेजारील पिचिंग , ओजाळे पाखाडी मधील जोशी यांच्या घराशेजारील पिचींग ही सर्व ढासळलेली आहेत . त्यामुळे छोटे मोठे अपघात होतात . वेळोवेळी सांगून देखील अद्याप ही कामे झालेली नाहीत . तरी तेथे मोठे अपघात होऊ नयेत म्हणून त्वरित ही कामे पूर्ण करावीत . तसेच मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार श्रीवर्धन . प . हद्दीतील भारताच्या संरक्षण सेवेतील अर्ध सैनिक , सैनिक तथा माजी सैनिकांना संरक्षण मंत्रालयाच्या विविध करांबाबतच्या पत्रांन्वये सर्वसाधारण कर व इतर नळपट्टी इ . कर माफ करण्यात यावेत . मुख्याधिकारी यांना दिलेल्या दुसया निवेदनात नगर परिषदेच्या प्रवेश द्वारासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसविण्यात आलेला असून त्याच्या दोन्ही बाजूस भुवनाळे तळे व जिवनेश्वर तळ्याचे प्रकल्प ( प्लॅन ) ठेवण्यात आलेले आहेत . ते तेथून काढून टाकण्यात यावेत , कारण तेथे नागरिक हे महाराजांचे पुतळ्याच्या ठिकाणी बसून वर उल्लेखित तळ्यांच्या प्लॅनवर लिखाण करीत बसतात . नगराध्यक्ष व मुख्याधिकारी याबाबत कोणती कार्यवाही करतात याकडे लक्ष आहे .
श्रीवर्धन न . प . प्रशासनाचे विकासाबाबत वेधले लक्ष
Admin Team
0

Post a Comment