म्हसळा : प्रतिनिधी
तालुक्यात राजिप . सेस फंडअंतर्गत बीट व तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जि . प . शाळा केलटे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या . यामध्ये तालुक्यात मुलींनी सर्वच स्पर्धेमध्ये बाजी मारली आहे कबड्डी मुले बीटस्तर ( खामगाव बीट ) प्रथम क्र . कांदळवाडा व द्वितीय क्र . पाटी व मुली कबड़ी प्रथम क्रमांक ठाकरोली व द्वितीय आमशेत यांनी पटकाविला . मेंदडी बीट कबड़ी मुले , प्रथम देवधर व द्वितीय रोहिणी तर मुली कबड्डी प्रथम केलटे व द्वितीय सालवंडे यांनी पटकाविला . तालुकास्तरीय कबी मुले प्रथम कांदळवाडा , द्वितीय देवघर कोंड , मुली प्रथम ठाकरोली व द्वितीय केलटे यांनी पटकाविला . संस्कृतिक स्पर्धा बीट खामगाव पारंपरिक गीत प्रथम खारगाव बु . व द्वितीय भापट व मेंदडी बीटमध्ये प्रथम मेंदडी मराठी व द्वितीय खारगाव खु . यांनी पटकावला . नाटीकरण स्पर्धा खामगाव बीट प्रथम ठाकरोली व द्वितीय संदेरी मराठी , मेंदडी बीट प्रथम खरसई मराठी व द्वितीय गोंडघर मराठी यांनी पटकाविला तालुकास्तरीय पारंपरिक गीत प्रथम मैदडी मराठी व द्वितीय खारगाव खु , नाटीकारण स्पर्धेमध्ये प्रथम ठाकरोली व द्वितीय खरसई मराठी या शाळांनी यश संपादन केले आहे . सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून तालुक्याच्या सभापती छाया म्हात्रे , प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती संदीप चाचले , सदस्य मधुकर गायकर , गटविकास अधिकारी प्रभे , सरपंच आरती काससँग , उपसर्पच गणेश बोलें , पो . पा . किसन पवार गाव अध्यक्ष अनंत धाडवे , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मुकुंद बोरले , महिला मंडळ अध्यक्षा बायमाबाई कासर्ग , तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख शिक्षक , विद्यार्थी , ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment