स्व ची ओळख व्यक्तिमत्त्व घडवते .... तुषार घाडगे
श्रीवर्धन प्रतिनिधी :
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्व ची ओळख होणे आवश्यक आहे .आपल्या आवडी प्रमाणे क्षेत्र निवडा व त्या नुसार कार्य केल्यास मनास मिळणारे समाधान उच्च कोटीचे असते .असे प्रतिपादन तुषार घाडगे यांनी महर्षी कर्वे कॉलेज श्रीवर्धन येथे आयोजित व्याख्यानात प्रसंगी केले .ज्ञानदान क्लासेस आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर व्याख्यानात घाडगे यांनी विद्यर्थ्यांशी सवांद साधला .ग्रामीण भागातील विदयार्थी वर्गात प्रचंड क्षमता असतात परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने विदयार्थी अपेक्षित ध्येय साध्य करत नाहीत. शिक्षणाचा मार्ग चुकल्यास त्याची परिणीती आयुष्य भर सोसावी लागते .आज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण घर बसल्या अनेक शैक्षणिक बाबी साध्य करू शकतो .विविध ज्ञान शाखा आज आपल्या समोर उपलब्ध आहेत फक्त गरज आहे योग्य मार्गदर्शनाची .व्यक्तीने मोठे स्वप्न बघावे व त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी संघर्ष करावा .मेहनत, चिकाटी व परिश्रम हे शब्द स्वप्न साकार करण्यासाठी महत्वाचे आहेत .त्याचा वापर जो विदयार्थी करतो तो निश्चितच यशस्वी झाल्या शिवाय राहत नाही. तुमची आजची उपस्थिती तुमच्या मनातील भावना व्यक्त करत आहे त्यामुळे तुम्ही निश्चित च अधिकारी पदावर विराजमान होणार असे तुषार घाडगे यांनी सांगितले.सदरच्या व्याख्यानात घाडगे यांनी महाराष्ट्र राज्य सेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेची माहिती व तयारी याचे विस्तृत वर्णन केले . कार्यक्रम प्रसंगी ज्ञानदान क्लासेस चे संतोष सापते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी कॉलेज चे प्राध्यापक अनिल वाणी , रुपेश गरफडे ,अक्षता तोडणकर मॅडम, तृप्ती विचारे मॅडम ,केदार जोशी, दिनेश भुसाने, प्रभाकर चौगले ,आकाश सावंत, मनीषा म्हशीलकर व मोठया संख्येने कॉलेज विद्यर्थिनीं उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध्रुवा पटेल यांनी केले .


Post a Comment