संजय खांबेटे : म्हसळा
भारतीय जनता पार्टी व जनसंकल्प प्रतिष्ठान म्हसळा यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन शनी. दि. १९ व रवि. २० जानेवारी रोजी म्हसळा येथील कन्या शाळेत करण्यात आले होते. पहील्या दिवशी २७१ व दुसऱ्या दिवसात २३२ असे एकूण ५०३ रुग्णानी याचा फायदा घेतल्याचे जनसंकल्प प्रतिष्ठानचे सचिव आमित कोबनाक यानी सांगितले. यामध्ये ४२ रुग्ण मोतीबिंदू व अन्य रुग्ण हदय रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य अन्य प्रकारातील आहेत.जनसंकल्प प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी यांनी सुंदर नियोजन केले होते , कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सेवेकरीता लाईफलाईन हाॅस्पीटल, कामोठे, स्वदेश फाॅऊडेशन सलग्न लक्ष्मी आय केअर पनवेल व जिल्हा ग्रामीण रुग्णालय व जिल्हा आरोग्य टीम, यानी दोन दिवस सेवा दिली या सर्वाचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यानी आभार मानले.
कोबनाक यांच्या कल्पनेतून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची उत्तम व्यवस्था प्रतिष्ठानचे सचिव आमित कोबनाक यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.
श्री भालचंद्र करडे, मंगेश महशिलकर,प्रकाश रायकर, प्रशांत महाडीक, मनोहर जाधव, अनिल टिंगरे, वसंत शेडगे, शरद कांबळे, राजा चव्हाण, राकेश हेलोंडे, मंगेश मुंडे, कृष्णा होडे, रमेश पोटले, विश्वनाथ कदम, जयवंत आवेरे, संदिप कोबनाक, मधुकर रिकामे, जयसिंग बेटकर, कृष्णा कांबळी, सरोज महशिलकर, व अन्य असंख्य कार्यकर्ते यांनी सर्व रुग्णांची चोख व्यवस्था केली होती.

Post a Comment