विकासकामे करून लोकांना पाणी प्यायला द्या आणि मत न देता विरोधकांना पाणी पाजा - माजी मंत्री सुनिल तटकरे यांचे कार्यकर्त्यांना व जनतेला आव्हाहन



● कार्यक्रमाला अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती 

● पाभरे कोळीवाडा येथील शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

    जनेतेनी दिलेल्या मतदानावर निवडून आल्यानंतर सत्तेच्या सिंहासनावर बसल्यावर ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे त्यांची विकासकामे करण्यासाठी मन आणि बुद्धी शाबूत असणे गरजेचे आहे त्यामुळे जे शिवसेनेचे खासदार अनंत गीते हे विकासकामे न करताच भावनिक आव्हाहन करताना जनतेची फसवणूक करून मते मागून निवडून येतात अशा निष्क्रिय खासदारांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून घरचा रस्ता दाखवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून विविध विकासकामे करून घ्या आणि लोकांना पाणी प्यायला द्या आणि मत न देता विरोधकांना पाणी पाजा असे रोखठोक आव्हाहन कार्यकर्त्यांना व जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी पाभरे कोळीवाडा, खारगाव बुद्रुक व सुरई येथील नळपाणी योजना भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले आहे.
तसेच मी जनतेला व माझ्या कार्यकर्त्यांना जो शब्द देतो तो पाळतो आणि जनतेची कामे करतो त्यामुळे मी जनतेला दिलेल्या शब्दाला बांधील असतो. समर्थ बैठकीच्या विचारांची शिकवण मनात जपून जनतेची सेवा करण्याचे व्रत मी स्वीकारले आहे त्यामुळे निवडणुका आल्या की धर्माच्या किंवा जातीपातीच्या नावावर मते मागून गावागावात भांडणे लावण्याचा काम मी कधीच करणार नाही उलटपक्षी गावागावात विकासकामे करून असलेले तंटे मिटवण्याचे प्रामाणिक काम करीत असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच खासदार अनंत गीते यांच्यावर टीका करताना रायगड जिल्ह्यात मोठे परिवर्तन होत असून असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते, गाव वाडीवस्तीवरील विविध जाती धर्माचे संपूर्ण समाज राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे विचारधारेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत याचाच अर्थ जिल्ह्यातील निष्क्रिय खासदारांना मिळालेल्या खासदारकीचा व केंद्रातील मंत्री पदाचा जिल्ह्याचा विकासासाठी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग करता आला नसल्याने त्यांचे ते अपयशच आहे असे सांगून वारंवार अनंत गीते सांगतात की मला मतदारसंघात कारखाना आणायचा होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे कारखाना आणू शकलो नाही असे सांगून गीते त्यांच्या निष्क्रियतेचे व अपयशाचे खापर पंतप्रधानांवर फोडतात त्यामुळे स्वतः केंद्रात अवजड उद्योग मंत्री असताना देखील कारखाना आणू शकत नाहीत किंवा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाहीत म्हणून स्वतःचे अपयशाचे खापर पंतप्रधानांवर फोडू नका असा सल्ला देखील अनंत गीते यांना दिला त्याचबरोबर पंतप्रधानांनी जर अडवणूक केली असेल तर हिम्मत दाखवून मंत्री पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची धमक दाखवली पाहिजे होती असेही सुचविले. केंद्रात व राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना देखील आगामी निवडणुकीत शिवसेना सोबत आली नाही तर शिवसेना को पटक देंगे असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले आणि लगेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घ्यायला जातात त्यामुळे यावरून शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे याचा जनतेनेच विचार करायला पाहिजे असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात धर्मनिरपेक्ष विचार जपत जिल्ह्यात शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय व अन्य आघाडीतील पक्षांची अधिक मजबूत बांधीलकी करून जिल्ह्यातून विरोधकांना हद्दपार करणार असल्याचे देखील तटकरे यांनी सांगून मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत असलो तरी विकासकामे करताना कोणत्या गावात कोणता पक्ष आहे किंवा माझ्याकडे निवेदन घेऊन येणारे लोक कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार कधीच करीत नाहीत तर जनसेवा म्हणून मी आताही सत्तेत नसताना देखील विद्यमान सरकार मधील मंत्र्यांकडून कामे मंजूर करून घेतो असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. देशातील सरकार हा शेतकरी, कष्टकरी वर्गाचे जीवावर उठला असून जनतेला देशोधडीला लावण्याचे काम करीत असून देशात अराजकता माजविण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याने राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस आय नेत्या सोनिया गांधी, तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या विचारधारेतुन देशातील प्रमुख पक्षांचे नेते व मुख्यमंत्री यांनी एकत्रित येऊन जो लढा देण्याचा निर्धार केला आहे त्याला साथ देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असे आवाहन जनतेला केले आहे. तसेच आगामी काळात जिल्ह्यात कला, क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रातील कलाकारांना व खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार असून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे सांगून श्रीवर्धन मतदारसंघात एकही रासायनिक कारखाना येऊन देणार नाही अशी शपथ सुनिल तटकरे यांनी उपस्थित जनतेसमोर घेतली.
     यावेळी राष्ट्रीय नळपाणी योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाभरे कोळीवाडा येथील 10 लक्ष, खारगाव बुद्रुक येथील 55 लक्ष व सुरई येथील 51 लक्ष रुपये खर्चाचे नळपाणी योजनांच्या कामांचे भूमिपूजन माजी मंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रमासाठी माजी मंत्री सुनिल तटकरे यांचे समवेत तालुका अध्यक्ष समिर बनकर, जिल्हा संघटक बालशेठ करडे, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, जिप सदस्या धनश्री पाटील, युवक अध्यक्ष फैसल गीते, नगराध्यक्ष फलक नाझ हुर्जुक, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, मुसद्दीक इनामदार, पाभरे गण अध्यक्ष अनिल बसवत, खारगाव सरपंच अनंत नाक्ती, सरपंच अंकुश खडस, दामोदर पांडव, शाहिद उकये, सतिश शिगवण, संतोष सावंत, जनार्दन बसवत, यांसह राष्ट्रवादी व शिवसेनेचेही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा