आई . . मला बी शिकायचंय ! म्हणत देवखोलच्या चिमुकल्यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

फोटो संग्रहीत

प्रतिनिधी
श्रीवर्धन पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या टी . ए . कुलकर्णी सभागृहामध्ये संपन्न झाल्या . सदर स्पर्धेत श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम अशा रा . जि . प . शाळा देवखोल या शाळेने सादर केलेल्या " आई . . मला बी शिकायचंय ! या नाटयीकरणाने लहान गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे या यशाबद्दल शाळेचे , विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापिका श्रीमती माळवदे मॅडम यांचे श्री राऊत गटशिक्षणाधिकारी पं . स . श्रीवर्धन , श्री . पांगारकर केंद्र प्रमुख दांडगुरी व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले . सदर नाटयीकेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले " लेक शिकवा अभियान " अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचा विषय अगदी सहज व सुंदरपणे हाताळला होता . या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे पंचक्रोशीत कौतक होत आह . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा