श्रीवर्धन तालुक्यात मतदान जनजागृती



दिघी : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ते दिघी अशा एकवीस गावात ईव्हीएम सोबत व्हीव्हीपँट जनजागृती करण्यात आली . आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपपँटचा वापर केला जाणार आहे मतदाराने कोणत्या उमेदवारास मतदान केले . हे व्हीव्हीपँटवर सात सेकंद दिसणार असल्याने मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे , निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीेपँटचा वापर कसा होणार आहे याविषयी मतदारना माहिती देण्यात आली. याजनजागृती मोहिमेंतर्गत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात दिघी गणातील असलेल्या सर्व मतदान केंद्रातील एकवीस गावांमध्ये महत्त्वाच्या चाळीस सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपँट बाबत जनजागृती करण्यात आली. याची सुरुवात बोर्लीपंचतन येथे करण्यात आली व शेवट दिघी आदिवासीवाडी येथे झाले प्रसंगी नियुक्त पथकातील प्रशिक्षित बोर्लीपंचतन मंडळ . अधिकारी सुनील मोरे , तलाठी निलेश पवार सुनील भगत , दत्ता करचे , रेश्मा विरकुट व तलाठी संदीप मोरे या कर्मचार्यांमार्फत जनजागृती व प्रशिक्षण प्रयोजनार्थ उपलब्ध करून दिलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपँटद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून मतदारांना प्रत्यक्ष मतदान करून घरोघरी आपल्या कुटुंबातील मतदारांना प्रक्रिया समजून देण्याची संधी मिळाली . प्रत्येक गावात दवंडी देऊन ही मोहिम राबविण्यात आल्याने नागरिकांनी व्हीव्हीपँट माहितीसाठी गर्दी केली तालुक्यातील जनजागृती मोहीम ही उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मोहीमेला नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत मतदार सर्व घटकांना ईव्हीएम - व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या शंका दूर करण्यासाठी महसूल विभागाने जनजागृती स्तुत्य उपक्रम राबविल्याचे रहीवासी मंगेश दिघी यांनी म्हटले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा