बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त म्हसळा शिवसेनेतील गटबाजी उघड ; वेगवेगळी साजरी केली जयंती.


म्हसळा : निकेश कोकचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती म्हसळा तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु या जयंतीनिमित्त शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाल्याचे चित्र बघायला मिळाले.याचे कारण म्हणजे दरवर्षी एकत्र साजरी करण्यात येणारी बाळासाहेबांची जयंती म्हसळा शहर संघटना, तालुका संघटना, माजी सभापती महादेव पाटील यांनी वेगवेगळी साजरी केली. म्हसळा शहर संघटनेकडून दिघी नाक्यावर बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप आणी शहरातील संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी माजी सभापती महादेव पाटील, माजी तालुका प्रमुख अनंत नाक्ती, शहर प्रमुख अनिकेत पानसरे, नथुराम खोत, उपशहर प्रमुख विशाल साळुंखे, सुजित बोरकर, अभय कळमकर, भाऊ खताते, कौस्तुभ करडे, विशाल सायकर, प्रतीक गोविलकर, कल्पेश जैन आणी शहरातील बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती महादेव पाटील यांनी आगारवाडा येथील जिजामाता शाळेमध्ये बाळासाहेब यांची जयंती साजरी केली. यावेळी विदयार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. म्हसळा तालुका संघटनेकडून शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सदर कार्यक्रमाला तालुका प्रमुख नंदू शिर्के, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, निशा पाटील,युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, बाळा म्हात्रे, श्याम कांबळे,उपशहर प्रमुख अक्रम साने, हेमंत नाक्ती,संतोष सुर्वे आणी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आगामी निवडणुकीपूर्वी हि गटबाजी उघड झाल्याने वरिष्ठ याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा