म्हसळयातील पत्रकारांची भूमिका सकारात्मक व सहकार्याची : प्रविण कोल्हे

प्रतिनिधी : म्हसळा
आज दि .6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून  म्हसळा पोलिस ठाण्यात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी तालुक्यातीत पत्रकारांची  सातत्याने भूमिका सकारात्मक व सहकार्याची असते,करीत असलेल्या सूचना अभ्यासू असतात असे सांगून पत्रकारांचा सत्कार व सन्मान केला. यावेळी
पोलिस उप- निरिक्षक दिपक ढुस, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, प्रेस क्लब अध्यक्ष अशोक काते, उपाध्यक्ष शशिकांत शिर्के, प सुशिल यादव, श्रीकांत बिरवाडकर , पो.हे.कॉ. सतीश महाडीक, सांगळे, विजय फापसे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा