संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा न्यू इंग्लीश स्कुल चे प्राचार्य बी.एन. माळी व म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सावित्रीबाई फुले जयंती व " पोलीस रेझींग डे "हे दोनही कार्यक्रम एकत्रित साजरे केले. न्यू इंग्लीश स्कुलमध्ये सांस्थापक प. पू. डॉ. बापूजी साळुंखे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राविण कोल्हे व पोउनी शहबाज शेख यानी पूजन केले व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावरील माहीती व महीलांसाठी सावित्रीबाई फुले यानी कसा त्याग केला, आता मिळत असणारे अधिकार या बाबत माहीती . सांगीतली . यावेळी शाळेतील R. S.P. व स्कॉऊटच्या विद्यार्थ्यनी म्हसळा शहरातून जनजागृती रॅली काढली. पोलीस रेझींग डे निमित्त पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या कार्यक्रमात अे.पी.आय. कोल्हे यानी शाळेतील विद्यार्थाना पोलीस स्टेशनचा कारभार, महीलां व नागरीकांचे सरक्षण
कशा पध्दतीने केले जाते, सद्य स्थितीत वापरण्यात येणारी हत्यारे या बाबत सविस्तर माहीती दिली. कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी प्राचार्य बि.एन. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक महामुलकर, मंगेश कदम, खोकले, जाधव सर, जंगम यानी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले होते.
" पोलीस रेझींग डे " निमित्त अे.पी.आय. प्रविण कोल्हे व. कर्मचाऱ्यानी पोलीस स्टेशनचा कारभार, महीलां व नागरीकांचे सरक्षण कशा पध्दतीने केले जाते. या बाबत माहीती दिल्यावर पोलीसांबाबत मनात असणारी भिती पूर्ण नाहीशी झाली. यापुढील काळात पोलीस दादा व ताईना मदत करायची व कधीही कायद्याचे उल्लंघन करायचे नाही असे आम्ही ठरविले आहे.
-धनश्री (विद्यार्थिनी )


Post a Comment