मातृभाषेतील शिक्षण व्यक्तिमत्त्व विकासात महत्वाचे ..नरेंद्र भुसाने (नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपालिका)
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आज स्पर्धेच्या युगात विदयार्थी घडवत असतांना मातृभाषा महत्वाची भूमिका बजावत आहे .विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मायबोली आवश्यक आहे .व्यक्तिमत्त्व विकासाठी मातृभाषेतून शिक्षण अगत्याचे आहे .असे प्रतिपादन नरेंद्र भुसाणे यांनी नगरपरिषद शाळांच्या स्नेहसंमेलन प्रसंगी केले .
मराठी शाळांनी आपली गुणवत्ता अबाधित ठेवत स्पर्धेच्या काळात उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे कार्य केले आहे. आपल्या शाळेतून अनेक प्रज्ञावंत विदयार्थी समाजाला मिळाले आहेत. इतर पाश्चात्य देशात मातृभाषे तुन शिक्षणास प्राधान्य दिले जाते आपल्या कडे इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढले आहे . सांस्कृतिक व बौद्धिक दृष्टीने विदयार्थी विकसित करण्यासाठी मराठी शाळा अग्रणी आहेत .आज 550 विदयार्थी आपल्या कडे शिक्षण घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे. असे भुसाने यांनी सांगितले.
सदरच्या स्नेहसंमेलन प्रसंगी श्रीवर्धन शहरातील सात शाळांमधील विद्यर्थ्यांनी नगरपालिका शाळा नंबर एक च्या भव्य प्रांगणात तीन दिवस आपले कलागुण सादर केले .


Post a Comment