वसंतराव नाईक महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जंयती साजरी

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा येथील बँरिस्टर ए.आर.अंतुलेसाहेब यांनी स्थापन केलेल्या आणि कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला ,वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे स्थापक आणि भारतीय स्वातंत्र्याचा तळपता सुर्य म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जंयती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी  अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन.राघव राव सर हे होते  कार्यक्रमासाठी  म्हसळा नगरपंचायत म्हसळा येथील स्वच्छता निरीक्षक  श्री.प्रमोद श्रीवर्धनकर  तसेच कर्मचारी श्री.सचिन मोरे ,सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ महाविद्यालयातील  प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरवातीस महाविद्यालयातील प्राचार्य  डॉ. व्ही.एस.एन.राघव राव सर यांनी  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयातर्फे आदरांजली अर्पण केली त्यानंतर महाविद्यालयातील व्दितीय वर्ष  वाणिज्य शाखेतील विद्यार्थी श्री.सौरभ जंगम याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्थान याविषयावर आपले मनोगत मांडले त्यामध्ये नेताजी जहालवादी कसे होते, त्यांनी वेशांतर करून ब्रिटिश अधिकाऱ्यांना कसे चकवले ,आझाद हिंद सेनेची स्थापना कशी केली हिटलर,मुसोलिनी यांचे सहकार्य कसे मिळवले याबाबत विविध दाखल्याच्या आधारे विद्यार्थ्यांना माहीती दिली त्यानंतर आपल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना  डॉ. व्ही.एस.एन.राघव राव सर यांनी सुभाषचंद्र बोस आणि सिव्हिल सर्विस परिक्षा याबाबत मार्गदर्शन करताना आयपीएस परिक्षेचे महत्व त्यामधील बदल ,गुणदान पद्धत  आणि विद्यार्थी जीवनात यापरिक्षेची तयारी कशी करावी याबाबत  विद्यार्थ्यांना माहिती देऊन सुभाषचंद्र बोस हे  तत्वज्ञानाचे अभ्यासक कसे होते आणि मानवी जीवनात तत्वज्ञानाचे असणारे महत्व यावर प्रकाशझोत टाकताना सुभाषचंद्र बोस  यांच्या जीवनावर आधारित कोणकोणती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजेत याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्दितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी कु.सुप्रिया सावकार हिने केले तर तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थीनी  कु.प्रणीशा गाणेकर हिने  कार्यक्रमाचे आभार मानले सांस्कृतीक समितीचे सदस्य आणि  तृतीय वर्ष कला शाखेतील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा