जीवना बंदर रस्त्यावर झाड पडून विद्युतपोल कोसळले


श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन जीवना कोळीवाडाला जाणाऱ्या पुलाजवळील रस्त्यालगत साठविलकर यांची नारळ - पोफळीची दोन्ही बाजूला वाडी आहे . त्या वाडीतील एक जिर्ण नारळाचे झाड बुधवारी सायं . ४ . १५  . च्या सुमारास रस्त्याच्या मधोमध पडले . यामुळे रस्त्यालगत असणारे २ विद्युत पोलही कोसळले . सुदैवाने जीवितहानी झाली नाही . मात्र वाहतूक काही काळी खोळंबली होती . तसेच नागरिकांना काही काळ अंधारात राहावे लागले . श्रीवर्धन जीवना कोळीवाडाला जाणाच्या पुलाजवळील रस्त्यालगत साठविलकर यांची नारळ - पोफळीची दोन्ही बाजूला वाडी आहे . बुधवारी सायंकाळच्या सुमारास दिनेश घोडमोडे आपल्या जवळील टेम्पो घेऊन जेटीवर जात होता . त्यावेळी अचानक साठविलकर यांच्या वाडीमधील नारळाचे जिर्ण झाड त्यांच्या टैम्पोच्या अगदी बाजूला पडले . सुदैवाने झाड बाजूला पडल्याने दिनेश घोडमोडे यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही . मात्र माडाच्या झाडामुळे रस्त्यालगत असणारे २ विद्युत पोल कोसळले पडले . दोन्ही विद्युत पोल रस्त्याच्या मधोमध पडल्याने रस्ता काही वेळ बंद झाला होता . त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या . हा रस्ता अरुंद असल्याने कोसळलेले विद्युत पोल बाजूला करण्यासाठी महावितरणच्या कर्मचायांना जास्त मेहनत करावी लागली . त्याचप्रमाणे नागरिकांना काळी काळ अंधारात राहावे लागले . या घटनेची माहिती महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी देवुलगावकर व तलाठी अर्जुन भगत यांना कळताच ते घटनास्थळी येऊन पंचनामा करून अहवाल सादर केला . महावितरण शाखा श्रीवर्धनचे अधिकारी कवळे यांनी तातडीने आपल्या कर्मचार्यांसह येऊन विद्युत पोल बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा