संजय खांबेटे म्हसळा
जनसंकल्प प्रतिष्ठान म्हसळा यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन शनी.दि. १९ व रवि. २० जानेवारी रोजी म्हसळा येथे करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे सचिव आमित कोबनाक यानी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. रायगड जिल्हयातील ग्रामिण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील गरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठानने शिबीराचे आयोजन केले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या कल्पनेतून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यान आले आहे. शिबिराला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत करणार असल्याचे अमित कोबनाक यानी सांगितले. शिबीर म्हसळा शहरातील कन्या शाळेच्या मैदानात शनी.दि. १९ व रवि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ते ५ या वेळेत होणार आहे.आरोग्य तपासणी साठी तज्ञ डॉक्टरांचे पथक येणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त जननेने शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकानी केले आहे.


Post a Comment