संजय खांबेटे : म्हसळा
तळा तालुक्यातील ताम्हने येथील विवाहीत महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. महीलेचे वडील रामदास महादू जाधव वय ६० रा. मौजे ताम्हने बौद्धवाडी, ता. तळा यानी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलीसानी गु.र.नं. १/२०१९ भादवी ३०६, ४९८ ( अ ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. रामदास जाधव यानी आपली मुलगी रोशनी हिने
ताम्हने -मजगाव येथील आपल्या रहात्या घरांत साडीने गळफास लावून मंगळवार दि. १५ रोजी आत्महत्या केल्याचे पोलिसांत सांगितले. आत्महत्या ग्रस्त रोशनी हीचा विवाह १७ वर्षापूर्वी प्रेमजीत शामराव येलवे रा. वाळवटी ता. श्रीवर्धन याचे जवळ झाला होता. जुगार व दारूच्या आहारी गेलेला प्रेमजीत हा गेले काही वर्ष पत्नी रोशनीकडे सातत्याने पैशाची मागणी करीत असे व मानसीक छ्ळ करीत असे ही गोष्ट फिर्यादीने आपल्या तक्रारीत सांगितले आहे. गुन्हयाचा तपास सपोनी प्रविण कोल्हे करीत आहेत. या गुन्ह्यात पती प्रेमजीत व त्याला साथ देणाऱ्याना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment