म्हसळा निकेश कोकचा
म्हसळा तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडताना दिसत असुन चक्क कोणतीही सुट्टी नसताना तालुक्यात रा.जी.प. शाळेतील एक शिक्षीका कोणतीही रजा अथवा बरिष्ठांची परवाणगी न घेता व शाळेतील विद्यार्थ्याना घरी पाठवून शाळेला लॉक लाऊन गेल्याची घटना घडली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा कु. अदिती तटकरे यांनी साभाळल्या नंतर जिल्हयातील शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशी आशा पालकवर्गाने व्यक्त केली होती. मात्र तटकरे कुटूंबीयांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या म्हसळा तालुक्यात या उलट स्थिती निर्माण झाली असून ,मौजे ताम्हाणे करंबे येथील जिल्हा परिषदच्या शाळेळा मंगळवार दि . २२ जानेवारी रोजी कोणतीही शासकीय सुट्टी नसताना टाळे होते. शाळेला टाळे असल्याबाबत अधिक माहिती घेतली असताना रा.जी.प ताम्हाणे करंबे शाळेतील शिक्षीका कोणताही रजेचा अर्ज केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी यांना न देता व विदयार्थ्याना घरी पाठवून शाळा बंद करुण निघून गेल्याचे समजले. जिल्हा परिषद शाळेतीत अश्या बेजबादार शिक्षक, शिक्षिकां व जिल्हा परिषदेच्या कमकुवत नेतृत्वामुळे तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे मत खारगाव येथील भालचंद्र नाक्ती यांनी मांडले. शाळेला टाळे लावून जाणाऱ्या शिक्षिकेच्या पतीवर त्याच शाळेत आरोग्य सेविकेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल असून हे शिक्षक पती पत्नी तटकरे आमचे जवळीक आहे असे भासवून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा खुलासा नाक्ती यांनी केला आहे. विनयभंग प्रकरणी निलंबनाची कारवाई झालेले शिक्षक त्याच शोळत वारंवार दिसतात व त्या आरोपीची शिक्षकाची पत्नी शिक्षिका शाळेला टाळे लावून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलत आहे. अशा बेजबाबदार शिक्षकांवर जिल्हा परिषदेतील अधिकारी कारवाई करणार की, शिक्षकांनी लावलेल्या तटकरे नावाच्या वशिल्यावर त्यांना सोडतील या निर्णयाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मी सध्या तळा तालुक्यात आहे, ताम्हाणे करंबे येथिल शाळेवर असणाऱ्या शिक्षिकेचा रजे साठी कोणताही अर्ज संबधित केंद्र प्रमुख व माझ्या कार्यालयात आलेला नाही. – श्री. शेडगे, ग. शि म्हसळा.
म्हसळा तालुक्यातील घडलेल्या प्रकरणाबाबत मी अधिक माहिती घेऊन, कोण दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देईन
– श्रीमती दराडे, शिक्षणाधिकारी, राजीप.
कोणतीही परवाणगी न घेता शाळेता टाळे लावून जाणाऱ्या ताम्हाणे करंबे येथिल शिक्षिके बदल बद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल
– आदिती तटकरे, रायगड जि.प अध्यक्षा.

Post a Comment