लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०१९ साठी शासन राज्ज ; ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके



संजय खांबेटे : म्हसळा
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०१९ ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती होण्यासाठी प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीचा कार्यक्रम आज तहसील कार्यालयाचे दालनात संपन्न झाला. नायब तहसीलदार के.टी भिंगारे , निवडणूक ना.तहसीलदार मोरे यांच्या मार्गदर्शना खाली ईव्हिएम- व्हिव्हिपॅटची म्हसळयात जनजागृती व प्रात्यक्षिके कार्यक्रम झाला.यामुळे ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचा प्रसार होतानाच अतीशय चांगल्या पध्दतीने जनजागृती झाल्याचे उपस्थितानी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष समीर बनकर, शिवसेनेचे नंदू शिर्के, नगराध्यक्ष फलक नाझ हुर्जुक, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, मा. नगराध्यक्ष दिलीप कांबळे, आस्मिता पोतदार, शाहीद उकये,सेजल खताते, जयश्री कापरे, संतोष काते, निशा नारायण पाटील, राजेंद्र गोलांबरे, अमानुल्ला रोगे, सुधीर कवीळकर , दिपाली कांबळे, शरद खापरे, पांडुरंग खोत, महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ईव्हिएम- व्हिव्हिपॅटचे मतदार नागरिकांची नोंदवही, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी , WPATs चिठ्ठयांची मोजणी  ही सर्व  प्रात्यक्षिके व नागरिकांचे शंका समाधानाचे मंडळ अधिकारी  मंगेश पवार, म्हसळा तलाठी के.एन. पाटील, विशाल भालेकर, वरवठणे तलाठी एस.के .शहा यानी अत्यंत अभ्यासू व परीपक्व उत्तरे दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवणूकी मध्ये  नव्याने वापरण्यात येणाऱ्या " ईव्हिएम- व्हिव्हिपॅट   " मशिनचे आज झालेले प्रात्यक्षिक प्रत्यक्ष वापर , समज- गैरसमज पूर्ण पणे दूर झाले, आम्ही EVM ने केलेले मतदान WPATs मध्ये नोंदले गेल्याची आम्ही खात्री केली. 
- दिलीप कांबळे, मा. नगराध्यक्ष, नगरपंचायत म्हसळा.

ईव्हिएम- व्हिव्हिपॅट मशिनचे आज झालेले प्रात्यक्षिक अतिशय चांगले झाले. EVM बाबत असणाऱ्या चर्चा व अन्य गोष्टी या अफवाच आसल्याचे त्यामुळे लक्षांत आले. ईव्हिएम- व्हिव्हिपॅट चे काम पारदर्शक आसल्याची खात्री झाली .
- सुधीर कवीळकर, शेतीनीष्ठ व प्रगतीशील. शेतकरी . काळसुरी -ता. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा