संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळेकरांच्या प्रदीर्घ मागणीमुळे व तब्बल २० वर्ष अर्ज विनवण्या करून म्हसळा तालुक्यासाठी ग्रामिण रुग्णालय मिळाले. ३० खाटाचे व सुमारे रु २ कोटी खर्च केलेल्या हया ग्रामिण रुग्णालयाचे उद्घाटन २५ मे २०१४ ला झाले, आज तब्बल ५ वर्ष झाली तरी म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी आधिक्षक अगर वैद्यकिय अधिकारी शासन देऊ शकले नाही हे म्हसळेकरांचे दुर्देव का शासन करीत आहे राजकारण हा प्रश्न म्हसळे करांना पडला आहे.
राजकारण काय आहे ?
ग्रामिण रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे म्हणून सतत विरोध करणारी शिवसेना आता सत्तेत व आरोग्य खाते सुद्धा डॉ . दिपक सावंत यांच्याकडे असताना ग्रामिण रुग्णालय सुरळीत सुरु व्हावे यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाही . विधानसभेचे स्थानिक आमदार ह्यानी सुद्धा विशेष पाठ पुरावा केल्याबाबत माहीती नाही. माजी पालकमंत्री सुनील तटकरे यानी मी निधी आणलाय माझाच हक्क आहे उद्घाटनाचा करून हक्काने उद्घाटन केले. व पुढे २०१६ साली एका कार्यक्रमात तटकरे यानी ग्रामिण रुग्णालय आम्हीच आणले, आता सत्ता मात्र शिवसेनेची आहे?त्याना शक्य असेल तर उर्वरीत सोयी -सुविधा आणाव्यात आमची हरकत नाही.
ग्रामिण रुग्णालयांतील त्रुटी. कर्मचारी व अस्थापना
ग्रामिण रुग्णालयाचे अकृतीबंधा प्रमाणे असणारे अधिकारी- कर्मचारी पुढील प्रमाणे ( कंसातील आकडे रीक्त पदांचे )वैद्यकिय अधिक्षक मंजुर पद १ ( रिक्त १), वैद्यकिय अधिकारी ३ ( ३), कनिष्ठ लिपीक २ (१),क्ष कीरण तंत्रज्ञ १(१), प्रयोग शाळा सहा. १(१), कक्ष सेवक ४ (३), सफाई कामगार २ (२ ), परिचारीका ७ ( १), सुरक्षा रक्षक ३ (३).
ग्रामिण रुग्णालय सुरु होऊन ५ वर्ष झाली तरी पुढील सामुग्री नाही...
रुग्णालयाला आवश्यक असणारा विद्युत पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी थ्री फेज कनेक्शन व स्वतंत्र D. P. ची आवश्यकता आहे.एक्स रे, E.C.G. मशीन, B.P. ऑपरेटर,
रक्त नमुने चेक करायचे Advance मशीन, ऑक्सीजन सिलेंडर,१०८ व १०२ रुग्णवाहीका, cctv, जनरेटर, डीप फ्रिज, वॉशींग मशीन व अन्य.
ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी अधिक्षक अगर वैद्यकिय अधिकारी नसल्याने ग्रामिण रुग्णालयात अद्यापही रुग्ण कल्याण समितीची स्थापना केली नाही, परंतु 0.P. D. मधील निधीचा मनमानी खर्च मात्र सुरू आसल्याचे कळते, नगरपंचायत -नगरपालीका क्षेत्रांत कुटुंब कल्याण आरोग्य कार्यक्रमाची जनजागृती , स्थानिक सहभाग व सर्वेक्षण यासाठी ए. एन्. एम. ची नेमणूक करून घेणे अद्यापही झाले नाही. गरोदर माता, बाळंतपण निधी योग्य प्रकारे खर्च होत आहे का?हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. यासाठी रुग्ण कल्याण समितीची आवश्यकता आहे.
आज शुक्रवार दि.४ रोजी सकाळी १०.३० वा. ग्रामिण रुग्णालयाला भेट दिली असता 0.P.D. सुरू नसल्याचे प्रत्यक्ष बघीतले. अनेक रुग्ण खाजगी वैद्यकिय सेवेकडे वळले.
जसा राजा तसे प्रशासन अशी मार्मिक प्रतिक्रिया म्हसळा पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यानी दिली.

Post a Comment