क्रीडा प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील नानवली गावातील श्री रमेश जनार्दन गोरीवले यांची कन्या कु. आर्या गोरीवले हिने हॉंगकॉंग येथे झालेल्या 'आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स' स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. "जिम्नॅस्टिक खेळाडू" म्हणून वैयक्तिक ७ वे स्थान व ग्रुप मध्ये कास्यं पदक मिळवून रायगड जिल्हाचे व महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले. कु. आर्या हिचे पूज्यपाद मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजीं व आदरणीय नानासाहेब पाठारे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
कु. आर्या रमेश गोरीवले ही गेल्या ०६ वर्षापासून महाराष्ट्र कब्बड्डी असोसिएशन बिल्डिंग शिवाजी पार्क आणि स्वर्गीय श्री . राजीव गांधी क्रीडा संकुल धारावी येथे दररोज २ तास सराव करते. कु.आर्या सेंट जोसेफ हायस्कूल आग्रीपाडा(भायखळा) इयत्ता ६वी मध्ये शिक्षण घेत आहे .
कु.आर्या गोरीवले हीचे जम्हसळा live परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
Post a Comment