म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
पोलीस व नागरिक यांच्यात एक चांगली बांधिलकी निर्माण व्हावी या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस रेझिंग डे साजरा होत आहे या औचित्याने म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलीस ठाणे अंतर्गत दि.02 जानेवारी ते 08 जानेवारी 2019 या कालावधीत पोलीस रेझिंग डे सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला असून या सप्ताहाचे सांगता समारंभ कार्यक्रम तहसीलदार श्री.रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली दि.08 जानेवारी रोजी अंजुमन कॉलेज म्हसळा येथे आयोजित करण्यात आला होता.
सप्ताह दरम्यान पहिल्याच दिवशी न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा येथे रॅली काढून पोलीस रेझिंग डे सप्ताहला सुरुवात करून अंजुमन हायस्कूल व कॉलेज, आयडियल स्कुल, न्यु इंग्लिश स्कुल व कॉलेज, जिजामाता हायस्कूल वरवठणे व इतर विद्यालयातील 88 शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एक मित्र, स्वच्छता व फायदे, स्त्रियांवर होणारे अत्याचार अशा अनेक विषयांवरील वक्तृत्व व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तसेच तालुक्यातील कराटे खेळणाऱ्या खेळाडूंनी देखील या सप्ताहात भाग घेऊन महिला, मुली, विद्यार्थी यांना कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखवले व आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता तसेच ज्या शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सांगता समारंभ अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तहसीलदार रामदास झळके यांनी सांगितले की समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचार यांवर मात करण्यासाठी व विविध अत्याचारीत घटनांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक आत्मसात केले पाहिजेत असे सांगून जास्तीतजास्त महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपून समाजातील घटकांनी स्त्रियांना चांगली वागणूक देऊन त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. तसेच होत असलेल्या अन्यायाबाबत कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. पोलीस हे आपले मित्रच आहेत ते आपल्या रक्षणासाठीच दिवसरात्र काम करीत असतात त्यामुळे पोलिसांप्रती समाजात आदरभाव निर्माण झाला पाहिजे आणि नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांची माहिती पोलीस प्रशासनाला दिली पाहिजे असे आव्हाहन नागरिकांना केले. तसेच पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी पोलीस रेझिंग डे चे महत्व सांगताना असे सांगितले की नागरिकांच्या मनात पोलिसांप्रती असलेली भीती दूर करून पोलीस व नागरिक यांच्यात समनव्यायाची भूमिका निर्माण होऊन सामाजिक व्यवस्था व कायदा सुव्यवस्था यांचे पालन कसे केले जाईल याची माहिती नागरिकांना दिली पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी पोलिसांबरोबर निसंकोच संवाद साधुन सामाजिक सलोखा जपला पाहिजे तसेच महिला, मुली, विद्यार्थी व नागरिकांना पोलीस प्रशासनातील हत्यारे व इतर यंत्रसामग्री यांचे महत्व व माहिती आणि ते कसे हाताळले जातात याबाबत माहिती व्हावी व जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस रेंझिग डे साजरा केला जातो असे सांगून या सप्ताहात शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, शिक्षक, इतर सरकारी अधिकारी वर्ग आणि पोलीस प्रशासनातील सर्व सहकारी व कर्मचारी यांनी चांगले सहकार्य करून सप्ताह यशस्वी केल्याबद्दल पो.निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सांगता समारंभ कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके, पोनि. प्रविण कोल्हे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, नगरपंचायत मुख्याधिकारी वैभव गारवे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, प्राचार्य बी.एन.माळी, प्राचार्य डॉ.शेख सर, प्राचार्य माळी सर, सलाम कौचाली, मनोहर तांबे, पोलीस उपनिरीक्षक दिपक ढुस, खराडे, अन्य पोलीस कर्मचारी यांसह पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment