म्हसळा प्रतिनिधी
आपल्याला रायगडचा खासदारच नव्हे तर श्रीवर्धनचा आमदारही शिवसेनेचाच आणून राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणायची आहे . आपण स्वबळावरच निवडणूक लढविषार असून , शिवसैनिकांनी त्यादृष्टीने कामाला लागावे असे आदेश रायगडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री ना . अनंत गीते यांनी शिवसैनिकांना दिले . म्हसळा तालुक्यातील आमशेत येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे त्याचप्रमाणे आंबेतकोंड येथील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ना . गीते यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बलत होते . जिल्हा प्रमुख रवि मुंडे , श्रीवर्धन मतदार संघ संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर , जिल्हा सल्लागार आप्पा विचारे , तालुका प्रमुख नंदू शिर्क , प्रमुख गजानन शिंदे , अवजड वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्याम कांबळे , विभागप्रमुख बंड्या विचारे उपविभागप्रमुख राजू सावंत महिला आघाडीप्रमुख निश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते . या मतदार संघात खासदार निधी , शासनाचा निधी त्याच प्रमाणे जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून घेत विविध कमांचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे श्री . गीते यांनी यावेळेस सांगितले . राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाहिले आहे . ते स्वप्न सत्यात आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे . राज्यांत एकहती सत्ता येत असताना त्यात श्रीवर्धनचाही आमदार आपलाच असला पाहिजे , अशी भूमिका ना . गीते यांनी यावेळेस मांडली. या दौऱ्यादरम्यान संदेरी मोहल्ला येथे मुस्लीम समाजाच्या दतीने न . अंतुले यांचा सत्कार करण्यात आला.
बॅ. अंतुलेंच्या निवासस्थानी नाविद अंतुलेबरोबर चर्चा...
आपल्या या दौर्यादरम्यान ना. अनंत गीते यांनी आंबेत येथील स्व .बॅ . ए . आर . अंतुले यांच्या निवासस्थानाला भेट देऊन स्व . अंतुले यांना आदरांजली अर्पण केली . त्याच प्रमाणे त्यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांच्याबरोबर चर्चा केली . या चर्चेमुळे रायगडच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे गीते - अंतुले यांच्यात काय चर्चा झाली त्याचा तपशिल उपलब्ध झालेला नाही . काही दिवसांपूर्वीच नाविद अंतुले यांनी ना . गीते यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती . त्या भेटीत मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा झाली होती . त्याच वेळेस आंबेत येथे बॅ . अंतुले यांच्या निवासस्थानी भेट देण्याचे निमंत्रण नाविद अंतुले यांनी दिले होते त्या निमंत्रणाचा मान ठेवीत ना . गीते यांनी ही भेट दिली . या भेटीच्या वेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवि मुंडे , म्हसळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ . मोईज शेख म्हसळा शहर अध्यक्ष रफी घरटकर उपस्थित होते .


Post a Comment