म्हसळ्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादासाठी धडपड.


म्हसळ्यामध्ये विकासकामांच्या श्रेयवादासाठी धडपड : रविवारी मा.मंत्री सुनिल तटकरेंचाच्या हस्ते चार गावातील न.पा.पू योजनेचा अशासकीय भूमिपूजन : भाजपही हेच भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हान याच्यांहस्ते करणार : योजना कोणाची गावकरी मात्र संभ्रमात

म्हसळा : निकेश कोकचा 

लोकसभा निवडणूकीआधि म्हसळा तालुक्यात विकास कामांच्या श्रेयवादाची धडपड सुरु झाली असून तालुक्यातील चार गावांमध्ये मंजुर न.पा.पू. योजनेचे धावते भूमिपूजन रविवार दि. २० जाने. रोजी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणिस सुनिल तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र हे भूमिपूजन अशासकीय असल्याचा दावा भाजपने केला आहे. यामुळे या योजनांचे शासकीय भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करणार असल्याचे म्हसळा भाजपने स्पष्ट केले.
रविवार दि. २० जानेवारी रोजी माजी मंत्री तथा माजी आ. सुनिल तटकरे म्हसळा दौऱ्यावर येणार असुन महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल अंतर्गत तालुक्यातील गोंडघर मोहल्ला येथे ३०.४० लाख, सुरई मोहल्ला येथे ५१.४० लाख, खारगाव बु. येथे ५५.८ लाख मंजुर झालेल्या योजनेचे तर पाभरे कोळीवाडा येथील न.पा.पू योजनेसाठी अंदाजे ९.९९ लाख रु चा निधी मंजुर करुण आणल्याचे पत्र व या योजनेचा भूमिपुजन करणार आहेत. मा.मंत्री सुनिल तटकरे स्वताच्या स्वार्थासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हान व जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर याच्या प्रयत्नामुळे पाणीपुरवठा मंत्री बबणराव लोणीकर यांनी मंजुरी दिलेल्या योजनांचे भूमिपुजन कोणत्याही शासकीय हुदयावर नसताना करीत आहेत, असा आरोप म्हसळा भाजपाने केला आहे. सुनिल तटकरे यांच्या या खोट्या श्रेयवादाच्या युक्तील उत्तर देण्यासाठी व जनते समोर त्यांचे खरे रूप आणण्यासाठी संबधित योजनांचे शायकीय कार्यक्रम लवकरच पालकमंत्री ना.श्री. रविंद्र चव्हान याच्या हस्ते करणार असल्याची माहिती भाजप उपजिल्हा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी दिली. राष्ट्रवादी – भाजपाच्या श्रेयवाद घेण्याच्या लढाईत गावकरी मात्र संभ्रमात असल्याचे दिसत आहेत.

श्रीवर्धन मतदार संघात माजी मंत्री श्री सुनिल तटकरे लोकसभा निवडणुकीत यश मिळावे या करीता म्हसळा, श्रीवर्धन परीसरात भाजपा सरकार ने मंजूर केलेल्या अनेक विकास कामांची खोटी भुमिपूजने व उदघाटने करून जनतेची फसवणूक करीत आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेतून अनेक गावात नविन नळपाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. या सर्व योजना आवश्यक आहेत याच बाब मुळे सरकार ने उच्च पातळीवर समिती द्वारे तपासणी सुरू केली आहे. अद्याप या कामासाठी तांत्रिक मंजूरी नसताना व निविदा काढली नसताना तटकरे परीवार या योजनांचे भूमिपूजन करुण लोकांची दिशाभूल करीत आहे. 
- कृष्णा कोबनाक, उपाध्यक्ष, भाजप रायगड.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा