प्रतिनिधी : बोर्लीपंचतन
दिघी सागर पोलीस ठाणे हद्दीतील वडवली फाटा येथे गुरुवारी ( दि . १० ) रात्री पावणे दहाच्या सुमारास दिघी पोर्ट येथे जाणाऱ्या ट्रेलरने ठोकर दिल्याने दिपक महादेव निगुडकर ( वय ३७ वर्षे ) या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली . श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्लीपंचतन जवळील वडवली फाटा येथे रात्री ९ : ४५ च्या सुमारास दिर्घ पोर्ट येथे रविंद्र बाळाराम चव्हाण ( ४२ , रा . चेंबूर ) हे त्यांच्या ताब्यातील ट्रेलर भरधावपणे घेऊन जात होते . ट्रेलर वडवली फाटा येथील चौकामध्ये आला असता तेथून रस्त्याने चालत जाणाऱ्या दिघी येथील रहिवासी असलेल्या दिपक महादेव निगुडकर या युवकाला जोरदार ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
रस्ते खराब तरीही मालवाहतूक...
सध्या माणगाव ते वडवली फाट्यादरम्यान रस्ता रुंदीकरणास जोरदार सुरुवात झाली आहे . असे असतानादेखील दिघी पोर्टकडून रात्री मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे . अवजड वाहतूक सुरूच असून त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे असा आरोप स्थानिक करत आहेत .

Post a Comment