सतराव्या लोकसभा निवडणुकीत रायगडचा खासदार मीच होणार, श्रीवर्धनचा आमदारही शिवसेनेचाच - केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा निर्धार
● महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढविणार
● महाराष्ट्रातील खासदारांमध्ये सर्वात जास्त निधी खर्च करणारा मी एकमेव रायगडचा खासदार
म्हसळा - श्रीकांत बिरवाडकर
23 जानेवारी 2018 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवुन महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचा खात्रीपूर्वक विश्वास व्यक्त करून देशातील 11 ते 16 व्या लोकसभेत रायगडचा मी सलग सहा वेळा खासदार झालो आहे आणि आता आगामी होऊ घातलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे यांना पराभूत करून दीड लाख मतांच्या फरकाने मी निवडून येऊन रायगडचा खासदार मीच होणार आणि त्याचबरोबर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचा आमदारही शिवसेनेचाच निवडून आणणार असा निर्धार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री तथा खासदार अनंत गीते यांनी दि.11 जानेवारी रोजी म्हसळा तालुका दौऱ्यात व्यक्त केला आहे.
संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वच खासदारांपेक्षा सर्वाधिक निधी खर्च करणारा मी एकमेव रायगडचा खासदार असल्याचे सांगून माझे आणि जनतेचे वेगळेच नाते आहे तसेच मी जनतेची कामे करतो, माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच माझ्या कार्यालयात नेहमीच विविध विकासकामांच्या मागणीचे निवेदन पत्र घेऊन लोक येत असतात त्यामुळेच निवडणुकी नंतर करण्यात येणाऱ्या 5 कोटी रुपये खर्चाचे प्रस्तावित कामांची निवेदने आगाऊ घेतली असल्याचे सांगितले. तसेच अनंत गीते यांनी श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा आमदार निवडुन येत नाही याची खंत व्यक्त करताना आगामी निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात शिवसेनेला स्वबळावर निवडुन येत सत्ता प्रस्थापित करायची असल्याने श्रीवर्धन मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा आमदार निवडुन आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी खासदार अनंत गीते यांनी आमशेत गावात 5 लक्ष रुपये खासदार निधी व 3 लक्ष जिल्हा नियोजन असे 8 लक्ष रुपये मंजुर निधीतून गावअंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व आंबेत कोंड येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करून फळसप, संदेरी या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांसी संवाद साधला.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख रवि मुंडे, संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर, जिल्हा सल्लागार अशोक आप्पा विचारे, तालुका प्रमुख नंदू शिर्के, संपर्क प्रमुख गजानन शिंदे, महिला आघाडी प्रमुख रिमा महामुनकर, निशा पाटील ,दीपा कांबळे, अमित महामुनकर, संदीप डोंगरे, सरपंच बंड्या विचारे, राजु सावंत, शाम कांबळे, रमेश कांबळे, श्रीकांत भावे, प्रवेश काजारे आदि मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Post a Comment