● प्राथमिक पहीले बक्षीस रेवली शाळेला
● माध्यमिक पहीले बक्षीस अे.आय.जे. म्हसळा
संजय खांबेटे : म्हसळा
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच ४ व ५ डीसें. संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनाचा मान तुलुक्यातील सर्वांगीन दृष्टया प्रगत असलेल्या खरसई प्राथमिक व माध्यमिक शाळेला मिळाला .
राज्यस्तरीय 44 व्या विज्ञान प्रदर्शनाच्या तालुकास्तरीय स्पर्धा नुकत्याच म्हसळा येथील राजिप शाळा खरसई येथे पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा मुख्य विषय "जीवनातील आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय" हा होता. याला अनुसरून प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण या गटात वेगवेगळ्या 80 पेक्षा जास्त मॉडेल या स्पर्धेत मांडण्यात आले होते. 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक, S. M. C सदस्य व पालकांनी या प्रदर्शनाला भेटी दिल्या.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घघाटन सभापती छाया म्हात्रे यांचे हस्ते झाले . यावेळी उपसभापती संदीप चाचले, जि.प. सदस्य संदीप चाचले, जि.प. सदस्य बबन मनवे, श्रीमती धनश्री पाटील, माजी सभापती उज्वला सावंत,मधु गायकर, ग. वि. अ. वाय. एन. प्रभे , ग.शि. अ. संतोष शेडगे, सरपंच महादेव कांबळे, S. M.C. अध्यक्ष निलेश मांदाडकर उपस्थित होते.
या स्पर्धेत राजिप शाळा रेवली येथील सिमरन तुकाराम कांबळे व पायल नागेश माळी या दोन विद्यार्थिनींनी वैज्ञानिक कल्पकतेचा वापर करून तयार केलेल्या " प्रकाश देणारा कृत्रिम चंद्र " या विज्ञान मॉडेलचा प्राथमिक गटातून ( इयत्ता 6 ते 8) तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. विषयाची निवड, विषयज्ञान, नाविन्यता, त्याची उपयुक्तता व पर्यावरण पुरकता या निकषानुसार मॉडेलचे परीक्षण करण्यात आले होते. तसेच शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रकारात राजिप शाळा रेवली येथे कार्यरत असलेले शिक्षक संदिप कृष्णा जाधव यांच्या "चुंबकत्व- चुंबकाची जादू" या विज्ञान शैक्षणिक साहित्याला तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळाला आहे.
शाळा व्यवस्थापन समिती रेवली चे अध्यक्ष नरेंद्र पदरत मुख्याध्यापिका संगीता आंबेडकर, शिक्षक संदीप जाधव लहू गुरमे , प्रणिता गावित यानी विशेष परिश्रम घेतले.
प्राथमिक व माध्यमिक विभाग विज्ञान मॉडेल, निबंध , वकृत्व, प्रश्नमंजुषा ,शैक्षणिक साहीत्य मॉडेल, लोकसंख्या शिक्षण अशा अनेक विषयांतून स्पर्धा घेण्यात आल्या ३० स्पर्धकाना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी पारीतोषीके देण्यात आली.
Post a Comment