महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर!


मुंबई : विनायक जाधव

भारतातील तमाम पिडीत, शोषित, कामगार,कष्टकरी, शेतकरी, बहुजनांचे मसिहा, प्रकांड पंडीत, विद्वतेचे महामेरू, विश्वरत्न, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला. जसजशी बाबासाहेबांच्या कार्याची महती जनमाणसांत पोहोचत आहे तसा प्रत्येक वर्षी गर्दिचा उच्चांक मोडत आहे.  

चैत्यभुमी ते वरळी सी फेस मार्गापर्य॔त दुरवर पसरलेली अभिवादन कर्त्यांची शिस्तप्रिय रांग, आपल्या मुक्तिदात्याला अभिवादन करण्याठी हळूहळू पुढे सरकत होती. समता सैनिक दल आणि मुंबई पोलिस चोख व्यवस्था सांभाळत होते.

देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या भिमअनुयायी यांच्या भोजनाची आणि फराळाची व्यवस्था सेवाभावी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत होती. एक वही एक पेन यांचे वाटप करून बाबासाहेबांनी दिलेल्या शैक्षणिक मंत्राचे जतन होताना दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा महामानवांच्या जीवनावरील पुस्तकांचे स्टाॅल्स, निळे बॅच, निळ्या टोप्या, महापुरुषांच्या तसबीरी, निळे ध्वज, पंचशील धम्म ध्वज इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

समाजातील नेत्यांचे ऐक्य होत नाही याची चर्चा आणि यासंबंधात आंबेडकरी जनतेतून व्यक्त होणारा संताप ऐकायला मिळत होता. बाबासाहेबांची भोळीभाबडी जनता आजतरी नेत्यांचे ऐक्य होईल या आशाळभूत नजरेने पहात आहे.

महत्वाचे असे की, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कुणावर जबरदस्ती केली जात नाही, कुणाला कसले अमिष दाखविले जात नाही. आपल्यावर असलेल्या मुक्तीदात्याच्या प्रचंड उपकाराच्या जाणीवेने हा अफाट जनसागर ऊन,पाऊस, वारा, वादळाची पर्वा न करता स्वताहून उपस्थित राहतो. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा