म्हसळ्यात महापरिनिर्वाण दिन साजरा



संजय खांबेटे : म्हसळा 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आज तहसील कार्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जितेंद्र टेंबे, गोवींदराव चाटे, नथुराम सानप, सचिन घोंडगे, संतोष तावडे, विशाल भालेकर, प्रकाश भोईर , रामकृष्ण कोसबे, जयंता भस्मा,  महेश रणदिवे, नरेश पवार, मोरे सर्कल, सरिता लिमकर पी.एन् पाटील, पोऊनी दिपक ठूस ,पो़.ना . सुर्यकांत जाधव , मणीयार,केशव कांबळे, दिपक चव्हाण , पांडुरंग कांबळे, श्रीमती सुचिता ऐनकर, बाकाराम उभारे, करंडे , मधुकर वावढळ, निलेश मांदाडकर,आदी ' मान्यवर व  कर्मचारी उपस्थित होते .अशाच पद्धतीने म्हसळा पंचायत समीती कार्यालयात सभापती छाया म्हात्रे  यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले यावेळी गटविकास अधिकारी श्री वाय.एम.प्रभे, कक्ष अधिकारी इंदुलकर, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री व्ही.बी.तरवडे, शिक्षण अधिकारी संतोष शेडगे , गजानन दिर्धा कर , चौधरी, काळे आदी कर्मचारी ग्रामसेवक उपस्थित होते.


फोटो. प्रतिमेचे पूजन करताना उपस्थित मान्यवर

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा