प्रतिनिधी : श्रीवर्धन
बुधवार दि.२६ डिसेंबर,२०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीवर्धन पेशवे मंदिर येथे आज CM चषक अंतर्गत भव्य उजवला- नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली व या स्पर्धेत श्रीवर्धन मतदार ४० नामांकित स्पर्धकांनी सहभाग नोंदवला व अतिशय जोशात कार्यक्रमाला सुरुवात झाली मा. श्री. कृष्णा कोबनाक विधानसभा अध्यक्ष व इतर मान्यवर यांच्या हस्ते शुभारंभ झाला व मार्गदर्शन करताना कला व क्रीडा गुणाला वाव मिळावा म्हणून मा. मुख्यमंत्री. ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात विविध प्रकारच्या १२ क्रिडा व कला स्पर्धा सुरू आहेत व युवकांना कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली व सर्व आयोजकांनी खुप मेहनत घेतली आहे त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी श्री संजय कोनकर यानी मार्गदर्शन केले, तालुका अध्यक्ष मा. प्रशांत शिंदे यांनी देखील सर्व स्पर्धा सहभागी संघाचे व मान्यवरांचे आभार मानले व जनतेला भाजपाला साथ दया असे आवाहन केले.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांक एस.के.बॉयज माणगांव, द्वित्तीय क्रमांक एस. के.डी. लाइव श्रीवर्धन, तृत्तीय क्रमांक आई गावदेवी खारगांव बु या संघानी पटकावाला. आणि वैयक्तिक मध्ये प्रथम क्रमांक यशोदिप - माणगांव, द्वितीय क्रमांक ज्ञानसी रेवणेकर - श्रीवर्धन, तृत्तीय क्रमांक चैताली गुरव - रोहा या स्पर्धाकांनी पटकावाला. अतिशय उत्तम अशा स्पर्धकांनमधुन अचूक परीक्षण झी युवा अप्सरा आली फेम अंकिता राऊत - अलिबाग व शांताबाई तसेच सुपरहिट गाण्यांचे नृत्य दिर्गदर्शक सागर सापले - पालघर या परिक्षकांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री अमित घाग, राज्य परिषद सदस्य श्री संजय कोनकर, लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, दिलीप हेंद्रे, मनोज गोगटे, महेश पाटील, शैलेश पटेल, मंगेश मुंडे, तुकाराम पाटील, आरती मांजरेकर, मीनाताई टिंगरे, अनिल टिंगरे, मंगेश शिगवन, गजानन निंबरे, संयोजक अॅड. जयदीप तांबुटकर, जयेश चोगले, ऋषिकेश पोलेकर, नवनीत तोड़णकर, सुदेश पोलेकर, शहर अध्यक्ष शैलेश खापणकर, मनीषा श्रीवर्धनकर, भालचंद्र करड़े, मनोहर जाधव, श्रीकांत नाक्ति व असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment