म्हसळा प्रतिनिधी
वसंतराव नाईक कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या रा . से . यो विभागाचे श्रमसंस्कार शिबीर दि . १७ डिसेंबर ते २३ डिसेंबर , या कालावधीत दुर्गवाडी येथे संपन्न झाले . या शिबिराची संगता डी . एड . कॉलेज चेअरमन नाजिम चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झाली . यावेळी प्रा . डॉ श्रीकृष्ण तुपारे प्राचार्य डॉ . राघव राव , गाव अध्यक्षगोपाळ बांद्रे , उपाध्यक्ष धोंडू बांद्रे , सचिव रघुनाथ बांद्रे , खजिनदार विलास काविणकर , नगरसेविका शीतल मांडवकर , महिला मंडळ , शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते . अध्यक्षीय मनोगतामधे नाजिम चौगले यांनी स्वच्छ भारत अभियान ही मध्यवर्ती संकल्पना नजरेसमोर ठेवून श्रमदान , वनराई बंधारे यां उपक्रमांबरोबरच मानवी जीवनातील जनजागृती करण्याचे प्रयत्न केले पाहिजे . असे आवाहन यावेळी केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी प्रा . जाधव केले . सूत्रसंचालन रोशन कासरे आणि नूतन पायकोळी यांनी तर प्रा . डॉ . जेंद्र यांनी आभार मानले .

Post a Comment