संजय खांबेटे म्हसळा
मागील दोन - तीन वर्षाचा पाणी टंचाई कालावधीचा अनुभव , प्रत्यक्ष गाव- वाड्याच्या भेटी व स्थानिक लोक प्रतिनिधींचे अभ्यासू मत घेऊन तालुक्याच्या पाणी टंचाई बाबत आराखडा करण्यात येतो. या मध्ये आक्टोबर ते जून या कालावधीत येणारी संभाव्य पाणी टचाई व कोणत्या पद्धतीने उपाय योजना करायचा असा आराखडा असतो. त्याप्रमाणे तालुक्यातील ८ गांवे व २३ वाड्यांचा टचाई आराखड्यात समावेश करण्याचे समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड याना कळविले आहे. सदर समितीत आमदार, सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता हे सदस्य आहेत.तालुक्यातील ८ गांवे व २३ वाड्यांना टंचाई परिस्थीतीवर मात करण्यासाठी शासनाने रू १८.६o लक्षची तरतुद केली आहे.
आराखडयांतील गावे व वाडया पुढील प्रमाणे...
१) कुडगाव कोंड २) गायरोणे ३) तुरूंबाडी ४ ) रोहिणी ५) आडी ठाकूर ६) घुम ७) खारगाव ( बु ), ८) खारगाव ( खु)
वाड्या - १) चंदनवाडी ( केलटे) २) सांगवड ( ठाकरोली) ३) लेप गौळवाडी ४ ) वाघाव बौध्दवाडी ५) कृष्णनगर ( खामगांव )६) बेटकरवाडी ( पाभरे)७)दगडघूम ( निगडी) ८) निगडी मोहल्ला ९) चिचोंडे ( पाभरे)१०) सुरई (खारगाव बु ) ११) घाणेरी कोंड (कोळवट) १२) पानवे (केलटे) १३) आगरवाडा बौद्धवाडी१४ ) आगरवाडा ( आगरी वाडी) १५ )तोराडी कुणबी वाडी १६) तोराडी आदिवासी वाडी १७) खामगाव गौळवाडी १८) खामगाव सोनघर १९) खामगाव मोहल्ला २०) ताम्हणे शिर्के २१) सकलप ( खारगाव खु) २२) तोंडसुरे जंगमवाडी २३) जिजामाता हायस्कुल (वरवठणे)
टंचाई आराखडा करण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावाचे प्रगती पथावरील योजना पूर्ण करणे , संबधीत योजनेला पूरक योजना करणे, योजनेची विशेष दुरुस्ती करणे , वापरांत असणाऱ्या विंधण विहीरी दुरुस्त करणे, स्थानिक विहीरी आघिग्रहीत करणे असे विविध पर्याय वापरल्यानंतर संबधीत गाव- वाडयाना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे समितीच्या माध्यमातून सूचविण्यात येते.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील तीन वर्षात विंधण विहीर कार्यक्रमाची परीपूर्ण पूर्तता झालीच नाही, तीच परीस्थिती म्हसळा तालुक्याची आहे. अनेक वेळा निधी वर्ग होत नाही , तर म्हसळ्या सारख्या दुर्गम तालुक्यात बोअरींग चे मशीन पाँईटवर मार्ग नसल्याने पोहचत नाहीत ही मागील स्थिती आहे. तर बहुतांश गावाना मुुबलकनिधी येऊनही सर्व ठीकाणी कामे सदोष झाल्याने तालुक्याला टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
-महादेव पाटील, माजी सभापती .पं.स. म्हसळा

Post a Comment