CM चषक अंतर्गत शेतकरी सन्मान भव्य कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन


मेंदडी वार्ताहर 
 महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सकल्पनेतुन महाराष्ट्रात साजरा होणारा देशातील सर्वात मोठा कला-क्रीड़ा महोत्सव सी.एम चषक अंतर्गत शेतकरी सन्मान भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन  जिजामाता हायस्कूल आगरवाड़ा वरवठने, ता म्हसळा येथे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष  कॄष्णा कोबनाक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी  राज्य परिषद सदस्य श्री.संजय कोनकर , तालुका अध्यक्ष शैलेश पटेल , तालुका अध्यक्ष श्रीवर्धन   प्रशांत शिंदे , तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, संयोजक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा महेश पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सी एम चषक कबड्डी स्पर्धेकरिता श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील 87 संघांनी सहभाग नोंदवला 
    या वेळी सरोज म्हशीलकर,मंगेश म्हशीलकर तुकाराम पाटील , आत्माराम शेलार,आशुतोष पाटील,शरद चव्हाण, मंगेश मुंडे ,मिना टिंगरे ,प्रियंका शिंदे तालुका ,धनश्री मुंडे ,भालचंद्र करड़े ,सुनिल विचारे ,अनिल टिंगरे ,गोविंद भायदे, श्री.मनोहर जाधव ,अनंत कांबले ,प्रशांत महाडिक ,विजय पाष्टे,जितेंद्र नाक्ति, मंगेश म्हात्रे, श्रीकांत नाक्ति,उद्देश म्हात्रे,तुकाराम भायदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा