● सीएम चषक शेतकरी सन्मान भव्य कबड्डी स्पर्धेचे कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते उदघाटन
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यात विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी व तरुण वर्गाला मैदानी खेळाच्या माध्यमातून आपल्यात असलेल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सकल्पनेतुन महाराष्ट्रात साजरा होणारा देशातील सर्वात मोठा कला-क्रीड़ा महोत्सव सीएम चषक अंतर्गत शेतकरी सन्मान भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दि.15 डिसेंबर रोजी म्हसळा तालुक्यातील छत्रपती शिवजी महाराज मैदान, जिजामाता हायस्कूल आगरवाड़ा वरवठणे येथे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री.कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला राज्य परिषद सदस्य संजय कोणकर, म्हसळा तालुक समन्वय समिती अध्यक्ष श्री.शैलेश पटेल, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष श्री.प्रशांत शिंदे, तळा तालुका अध्यक्ष श्री.कैलास पायगुडे, अमित घाग जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, कबड्डी स्पर्धा संयोजक श्री.महेश पाटील, सौ.सरोज म्हशीलकर जिल्हा चिटणीस, मंगेश म्हशीलकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तुकाराम पाटील तालुका सरचिटणीस म्हसळा, श्री.शरद चव्हाण तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, श्री.मंगेश मुंडे शहर अध्यक्ष, सौ.मिना टिंगरे तालुका अध्यक्ष महिला मोर्चा, सौ.प्रियंका शिंदे तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा, सौ.धनश्री मुंडे तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा, श्री.भालचंद्र करड़े तालुका उपाध्यक्ष, श्री.सुनिल विचारे तालुका चिटणीस म्हसळा, श्री.अनिल टिंगरे तालुका चिटणीस, श्री.गोविंद भायदे, श्री.मनोहर जाधव तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, अनंत कांबले सरपंच रेवली, श्रीकांत नाक्ति, उद्देश म्हात्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदघाटक कृष्णा कोबानाक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की तरुण वर्गाने मैदानी खेळाचे माध्यमातून विविध स्पर्धा खेळून आपले नावलौकिक मिळविले पाहिजे तसेच खेळ कोणताही असो त्या स्पर्धेत भाग घेऊन एक चांगला स्पर्धक म्हणून नाव चर्चेत ठेऊन समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे तसेच मैदानात उतरल्यावर जिंकण्याच्या जिद्दीनेच खेळ खेळला पाहिजे म्हणजे नंबर किंवा बक्षीस हे आपोआपच मिळेल असा सल्ला उपस्थित खेळाडूंना देऊन सीएम चषक कला क्रीडा महोत्सव आयोजित करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कृष्णा कोबनाक यांनी आभार मानले.
Post a Comment