म्हसळा नगर पंचायत व अतिक्रमणे म्हणजे आळवा वरचे पाणी ; परंपरा असलेला आठवडा बाजार नष्ट होण्याची भीती


संजय खांबेटे : प्रतिनिधी
म्हसळा नगर पंचायती तर्फे नगरपंचायत हद्दीतील भाडेतत्वावर दिलेल्या जागा , हातगाडया व अन्य दुकान टपऱ्या सातत्याने अतिक्रमण म्हणून तोडण्याचा फंडा नगरपंचायत लावत आसल्याच्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. काही दिवसांपूर्वी कारवाई करून अतिक्रमणे तोडल्याचे नगरपंचायतीचे जेष्ठ लिपीक अशोक सुतार यानी माहीती दिली. ही कारवाई  तीसऱ्यांदा झाल्याचे समजते.

यांच्या दुकान - टपरीवर केली कारवाई...
खालीद करदेकर,शादाब घरटकर, अनीस भालदार, सलीम मेमन, फातिमा चोगुले, प्रमोद किराणा, अजीम दफेदार, इकबाल कादरी,शकूर घनसार, अ.रहेमान हळदे,शकूर गनतारे, खालीद हुर्जुक, फरीद मेमन .

     सातत्याने अतिक्रमणे हाटविणे , पुन्हा अतिक्रमण करुन व्यवसाय पसरवीणे हा प्रकार पुन्हा- पुन्हा होत आसल्याने नगरपंचायतीने जाहीर दवंडीने शहरात अतिक्रमणे काढून घेण्याचे व्यापारी व नागरीकाना आवाहन केले होते. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे समजते . ही बहुतांश दुकाने ग्रामपंचायतीच्या ( पूर्वीच्या) स्थावर मालमत्ते पैकी जागेत "पट्टादार" (सलग सात वर्षे किंवा अधिक काळासाठी जागा वापरणारा) कराराने दिलेली आहेत. नगरपंचायत अस्तीत्वात येऊन ३-४ वर्षे होत आली तरी या बाबत कोणताही अभ्यास किंवा ठोस कारवाई केली जात नसल्याचे समजते. नगरपंचायतीने शहरांत दंवंडी देऊन आतिक्रमणांवर कारवाई करण्याचे संकेत देऊन भाडेपट्टेच्या जागेत केलेली कारवाई ही आकसाने आसल्याचा जाणकारांचा दावा आहे, अनेक पट्टेदारांकडे असणाऱ्या जागेपेक्षा वापरण्यात येणारी जागा जास्त आहे. मूळ मालक मयत आहेत त्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष का करते? हा शहरांत चर्चेचा विषय झाला आहे.


 गेले दोन वर्षे  मी नगरपंचायत स्थावर मालमत्ता हा विषय सतत चर्चला आणतो . मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करतात. गेल्या मासिक सभेत जेष्ठ अधिकारी सुधीर म्हात्रे यानी या विषयी अभ्यास करून प्रस्ताव सादर करायच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र नगर पंचायती स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण १९६७ प्रमाणे पट्टादारांचे करार ( ग्रामपंचायत काळातील ) तपासून सीमांकन व पुर्नरकरार करणे आवश्यक आहे.
-दिलीप कांबळे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष.


जंजीरा संस्थान मधील म्हसळा येथील आठवडा बाजाराला
१३६ वर्षाची परंपरा आहे.पूर्वीच्या म्हसळा महालाचे रूपांतर तहसील मध्ये, म्हसळा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती मध्ये झाले आहे. शासनाचा कृषी व पणन विभाग नव्याने आठवडा बाजाराची निर्मीती करत असताना नगरपंचायत प्रशासन अतीक्रमणाचे नावाखाली परंपरा असलेला बाजार आस्थिर करत आहे. सुक्या मच्छीच्या महीला व्यापाऱ्यांची संख्या दिवसें दिवस रोडावत आहे.
-महादेव पाटील , माजी सभापती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा