CM चषक म्हसळ्यात रंगणार ; म्हसळा येथे होणार शेतकरी सन्मान भव्य कबड्डी स्पर्धा



संजय खांबेटे: म्हसळा 
मा.मुख्यमंत्री. श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सकल्पनेतुन महाराष्ट्रात साजरा होणार देशातील सर्वात मोठा कला-क्रीड़ा महोत्सव अंतर्गत मा. ना. श्री.रविंद्र चव्हाण साहेब पालकमंत्री, यांच्या सहकर्याने सी.एम. चषक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिनांक 15,16 व 17 डिसेंबर 2018 रोजी छत्रपती शिवजी महाराज मैदान, जिजामाता हायस्कूल वरवठणे- आगरवाड़ा येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. श्री.प्रविण दरेकर विधानपरिषद आमदार, मा. श्री.प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. श्री. कृष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा, मा. श्री. अमित घाग जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा यांची रहाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीवर्धन विधानसभेतील सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी यांची राहणार आहे .
       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.महेश पाटील संयोजक शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धा व श्री.शरद चव्हाण युवा मोर्चा तालुका अध्यक्ष म्हसळा, तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी हे अथक प्रयत्न व परिश्रम घेत आहेत.
     सदरची स्पर्धा नि:शुल्क असून सर्व संघाना आवाहन करण्यात येत आहे की कबड्डी स्पर्धेमध्ये नोंदणी झाली नसल्यास लवकरच नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा