माणगांव : प्रतिनिधी
येत्या काळात रायगड जिल्ह्यात मनसे जोमाने वाढविणार , असा दावा मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी केला आहे . तालुक्यातील मुगवली येथील तरुण कार्यकर्यांच्या पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रीयन माणसांबद्दल असणारी अस्मिता व त्यांचे जाज्वल्य विचार यांनी प्रेरित होवून मुगवलीतील तरुणांनी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेत १० डिसेंबर रोजी जाहीर प्रवेश केला . मनसे कार्यालय माणगांव येथे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सांगले , माणगांव तालुकाध्यक्ष सुबोध जाधव , मनवि सेना जिल्हाध्यक्ष प्रविण शिंदे , तालुका वाहतूक सेना चिटणीस सचिन पवार विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष वृषभ वातेरे आदी मान्यवर उपस्थित होते . दक्षिण रायगडाची सूत्रे देवेंद्र गायकवाड यांनी स्वीकारल्यावर जिल्ह्यात मनसेची ताकद हळूहळू वाढू लागली आहे जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील तरुणवर्ग मनसेकडे आकर्षित होऊ लागली आहेत . नुकतेच मनसेने माजी गृह राज्यमंत्री बाळा नादगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली माणगांव तालुक्यातील विळे भागाड येथील पास्को कंपनीवर हजारोंचा मोर्चा काढला . स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे , या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चाची दखल कंपनीचे प्रमुख मिस्टर आन यांनी घेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मुंबई येथे बैठक घेवून मनसेच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी मिस्टर आन यांनी राज ठाकरे यांना दिले . मनसेचे हे आंदोलन यशस्वी झाल्यामुळे तालुक्यातील अनेक सुशिक्षीत बेरोजगार तरुण - तरुणी बायोडाटा घेवून देवेंद्र गायकवाड यांच्याकडे आशेने येत आहेत . या विद्यार्थ्यांना मनसेकडून निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे मुगवली येथील प्रवेशकार्यांमध्ये तरुण कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती तालुका वाहतूक सेनेचे चिटणीस सचिन पवार यांनी दिली .
Post a Comment